विशेष प्रतिनिधी
नाशिक : संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीने थैमान घातले असताना नाशिक मध्ये गंगा गोदावरीला आलेल्या महापुरात रामतीर्थ गोदाकाठी असलेली गोदाकुटी आज पूर्णपणे वाहून गेली. तरीही गोदावरी आरतीची उज्ज्वल परंपरा कायम राखण्याचा निर्धार रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने केला आहे. त्यानुसार आज सायंकाळी गोदा सेवकांनी गोदावरी महाआरती केली.The Godakuti of Ramtirth Godavari Seva Samiti
गंगा गोदावरीला आलेल्या आजच्या पूर प्रलयात रामतीर्थ गोदावरी सेवा समितीची गोदाकुटी वाहून गेली. गोदाकुटीतली कपाटे, तांब्या-पितळेची उपकरणे, पूजावस्त्रे, अलंकार, दानपेट्या, अगदी पूजेचे पठारदेखील नदीच्या प्रचंड लाटांसोबत नाहीसे झाले. परंतु, या मोठ्या नुकसानीनंतरही गोदा सेवकांची श्रद्धा आणि आत्मविश्वास अढळ राहिला असून सर्व गोदा सेवकांनी एकत्रितपणे पुनश्च उभारणीचा निर्धार केला आहे.
असीम धैर्य आणि सामाजिक ऐक्याच्या जोरावर आपण गोदाकुटी पुन्हा उभी करू. या कार्यात सर्व सभासदांनी प्रार्थना, सेवा आणि योगदानाच्या माध्यमातून सहकार्य करावे, असे आवाहन रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने केले आहे. नुकसान प्रचंड असले तरी महाआरती आणि सेवा अखंड सुरू राहतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. “आपणा सर्वांचा भक्तिभावच गोदावरी आरती आणि सेवांची परंपरा अखंड सुरू ठेवेल, असेही गोदा सेवकांनी नमूद केले.
नासिकचे नागरिक आणि भक्तांनी अशाप्रसंगी समितीच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे नम्र आवाहन समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी, सचिव मुकुंद खोचे उपाध्यक्ष, नृसिंह कृपादास, धनंजय बेळे, शैलेश देवी, राजेंद्र फड, शिवाजी बोंदार्डे, प्रफुल्ल संचेती आदींनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App