भारतात पहिली EMU ट्रेन धावली ९७ वर्षांपूर्वी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : लॉर्ड डलहौसी हे भारतीय रेल्वेचे जनक म्हणून ओळखले जातात. ३ फेब्रुवारी १९२५ रोजी भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक ट्रेनचे (Electric Multiple Unit -EMU)उद्घाटन आणि संचालन झाले. बाॅम्बे व्हिटी ते कुर्ला दरम्यान ही लोकल धावली. या गोष्टीला आज ९७ वर्षे पूर्ण झाली. The first EMU train in India ran 97 years ago

याआधी, उपनगरीय गाड्या स्टीम इंजिनद्वारे नेल्या जात होत्या. कॅमेल लेयर्ड आणि उरडिंगेन वॅगनफॅब्रिक (वॅगन फॅक्टरी) यांनी या ट्रेनसाठी लोकोमोटिव्ह म्हणजे इंजिन तयार केले. १० फूट रुंद सिमेंट फ्लोअरिंगचे ४ डबे असलेली पहिली EMU ट्रेन बॉम्बेचे गव्हर्नर सर लेस्ली विल्सन यांनी १० वाजता हिरवा झेंडा दाखवून रवाना केली. मोटरमन जहांगीर फ्रामजी दारूवाला होते.



गेल्या ९७ वर्षांमध्ये भारतीय रेल्वेच्या सुमारे ६४७०० रेल्वे किलोमीटरचे इलेक्ट्रिफिकेशन केले आहे. कोळशावर किंवा तत्सम इंधनावर चालणाऱ्या २९ टक्के रेल्वे देशाच्या विविध अंतर्गत मार्गांवर धावत आहेत. सुमारे ७१ टक्के लोहमार्ग वीजपुरवठ्याने परिपूर्ण आहेत.

The first EMU train in India ran 97 years ago

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात