प्रतिनिधी
जळगाव : शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर ज्या अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत, त्यापैकी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची एक वेगळी प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावरच शरसंधान साधले आहे. पण त्याचवेळी त्यांनी उद्धव ठाकरेंची थोडी बाजूही सावरून घेतल्याचे दिसत आहे. The fact that the bow and arrow broke, there is no point in blaming others for it
धनुष्यबाण मोडला ही वस्तुस्थिती आहे. आता इतरांना दोष देण्यात आता अर्थ नाही. उद्धव ठाकरेंच्या काही चुका झाल्या असतील. पण एखादी चूक एवढी मोठी नसावी की, त्यामुळे पक्ष संपून जाईल, अशा शब्दांत एकनाथ खडसेंनी प्रतिक्रिया दिली.
एकनाथ खडसे म्हणाले, की आता इतरांना दोष देण्यात अर्थ नाही. उद्धव ठाकरेंनी काय केले आणि एकनाथ शिंदे यांनी काय केले हे आता बोलून काहीच फायदा नाही. काही चुका उद्धव ठाकरेंच्याही असतील. ते पक्षप्रमुख आहेत, त्यांच्या चुका होऊ शकतात. पण धनुष्यबाण मोडले ही वस्तूस्थितीआहे. एवढी चूक एवढी मोठी नसावी की, त्यामुळे पक्ष संपावा. तुम्ही संपले आणि तेही संपले.
पुण्याई गोठवली
एकनाथ खडसे म्हणाले, ठाकरे आणि शिंदे यांच्या भांडणात वर्षानुवर्षाची पुण्याई गोठवली गेली. यापेक्षा दुर्दैवी प्रसंग नसावा, अशी खंत एकनाथ खडसेंनी व्यक्त केली. वाडवडिलांनी आयुष्यभर जे कमवलं ते एका मिनिटामध्ये मुलांनी गमावल्याचेही खडसे म्हणाले.
हा दुर्दैवी प्रसंग
खडसे काल टीका करताना म्हणाले होते की, आयुष्यभर बाळासाहेब ठाकरे यांनी जी मेहनत केली, ज्या धनुष्यबाणाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. ज्या धनुष्यबाणाच्या जोरावर या महाराष्ट्रामध्ये सत्ता मिळवली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. वर्षानुवर्षाची पुण्याई दोघांच्या भांडणांमध्ये गोठवली गेली. यापेक्षा दुर्दैवी प्रसंग नसावा.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App