कुबेर सारख्या विकृताचे तोंड काळे केले ते आज न उद्या होणारच होतं ; निलेश राणे यांनी गिरीश कुबेर यांच्यावर ट्विटद्वारे केली टीका

वरिष्ठ पत्रकार आणि लेखक गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केल्याचं समोर आलंय.The face of a pervert like Kuber was going to be blackened today or tomorrow; Nilesh Rane tweeted criticism of Girish Kuber


विशेष प्रतिनिधी

मुंबई : सध्या नाशिकमध्ये ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरु आहे.आज या साहित्य संमेलनाचा शेवटचा दिवस होता.दरम्यान या शेवटच्या दिवशी घडलेल्या घटनेवर संपूर्ण राज्यभर चर्चा सुरु आहे. कार्यक्रमाची सांगता होत असताना वरिष्ठ पत्रकार आणि लेखक गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केल्याचं समोर आलंय.



दरम्यान भाजपाचे निलेश राणे यांनी गिरीश कुबेर यांच्यावर ट्विटद्वारे टीका केली आहे.यावर निलेश राणे म्हणाले की , “छत्रपती संभाजी महाराज यांची लिखाणातून बदनामी करणाऱ्या कुबेर सारखा विकृताचे तोंड काळे केले.आणि ते आज ना उद्या होणारच होतं.” आणि जे कोणी हे काम केलं आहे त्यांचे मी अभिनंदन करतो, अशा शब्दात गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेकलेल्या कृत्याचं समर्थन केलं आहे.

गिरीश कुबेर यांनी लिहलेल्या ‘Renaissance State’ या पुस्तकात कुबेर यांनी आक्षेपार्ह लिखाण केल्याचा ठपका अनेकांनी ठेवला आहे. यावरून महाराष्ट्र भर वाद सुरू आहे. विविध राजकीय पक्ष, विविध संघटना, गट आणि लोकांकडून पुस्तकारावर बंदी आणण्याची देखील मागणी केली होती.

The face of a pervert like Kuber was going to be blackened today or tomorrow; Nilesh Rane tweeted criticism of Girish Kuber

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात