प्रतिनिधी
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडितने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला आहे. करिअरच्या सुरुवातीला ती पुण्यात राहात असताना घरमालक नगरसेवक घरमालकाने घरभाड्याच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी केली होती, असे तिने सांगितले. त्याने ज्यावेळी शरीरसुखाची मागणी केली, त्याचक्षणी त्याच्याच टेबलावरच्या ग्लासातील पाणी त्याच्या तोंडावर फेकून तिथून निघून गेल्याचे तिने सांगितले. The corporator had made an obnoxious demand; Shocking revelation of Tejaswini Pandit
तेजस्विनी म्हणाली :
2009-2010 मध्ये मी पुण्यातील सिंहगट रोडवरील एका अपार्टमेंटमध्ये मी भाड्याने राहत होते. ते घर एका नगरसेवकाच्या मालकीचे होते. एके दिवशी मी घराचे भाडे देण्यासाठी नगरसेवकाच्या ऑफिसमध्ये गेले, तेव्हा त्याने माझ्याकडे घरभाड्याच्या बदल्यात घाणेरडी मागणी केली. त्याच क्षणी त्याच्या टेबलावर असलेला पाण्याचा ग्लास उचलला आणि त्याच्या तोंडावर मी पाणी फेकले. अशा मार्गाचा अवलंब करायचा असता तर भाड्याच्या घरात राहिले नसते. माझ्याकडे माझे स्वत:चे घर असते, दारात गाड्या असत्या, असे मी त्याला सुनावले.
असे दोन गोष्टींमुळे घडले. त्याने माझ्या कामावरून माझ्याबद्दल मत बनवले होते. आर्थिकदृष्ट्या मी कमकुवत होते. पण अशा घटनांमधून मलाही शिकता आले.
तेजस्विनीने 2004 मध्ये ‘अगंबाई अरेच्चा’ या चित्रपटातून मराठी कलाविश्वात पाऊल ठेवलं. त्यानंतर तिने ‘मी सिंधुताई सपकाळ’, ‘तू ही रे’, ‘देवा’ अशा चित्रपटांमध्ये काम केलं. तिने काही मालिकांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. वेब विश्वातही तेजस्विनीने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. इन्स्टाग्रामवरही तेजस्विनीचा मोठा चाहतावर्ग आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App