विशेष प्रतिनिधी
मुंबई : Chief Minister ऑपरेशन सिंदूरवर लाेकसभेत झालेल्या चर्चेत काॅंग्रेसच्या साेलापूर लाेकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी तमाशा हा शब्द वापरला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे. ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणणं म्हणजे जे 26 भारतीय मारले गेले त्यांचा, सैन्याचा अपमान करण्यासारखे असल्याची टीका त्यांनी केली आहे.Chief Minister
ऑपरेशन सिंदूर हे नाव ऐकल्यानंतर यातून देशभक्ती दिसते. मात्र वास्तवात हा सरकारने मीडियावर केलेला एक तमाशा होता, अशी मुक्ताफळे खासदार प्रणिती शिंदे यांनी उधळली हाेती. त्यावर संताप व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांनी प्रणिती शिंदे यांचे नावही घेतले नाही. ते म्हणाले तमाशा म्हणणे म्हणजे 26 भारतीय मारले गेले त्यांचा, सैन्याचा, त्यांच्या परिवाराचा अपमान करण्यासारखं आहे. आमच्या सेनेने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानचं संपूर्ण टेरर नेटवर्क उद्धवस्त केलं, त्यांचा अपमान करण्यासारखं आहे. पाकिस्तानने आपल्यावर डागलेले एक हजार ड्रोन हवेतच उद्धवस्त करुन टाकले, त्या आपल्या भारतीय सैन्याचा अपमान केल्यासारखे आहे, असा संताप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांचे नाव न घेता केली आहे.Chief Minister
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “जर सेनेचा अपमान करणारे नेते आपल्याकडे असतील तर त्यांच्या बद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होणं स्वाभाविक आहे. पंतप्रधान मोदींनी काल या नेत्यांना उत्तर दिले आहे. काँग्रेसच्या नेत्यांना जे बोलता येत नाही, ते नव्या नेत्यांकडून वदवून घेतले जात आहे. ऑपरेशन सिंदूर म्हणजे तमाशा होता या वक्तव्याचा मी धिक्कार करतो. या प्रवृत्तीचा धिक्कार करतो. जी भाषा पाकिस्तान बोलत आहे, तीच भाषा काँग्रेस नेते बोलत आहेत, हे पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. पाकिस्तानने आमचं काहीही नुकसान केलं नाही, मात्र भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या एअर फिल्ड नष्ट केल्या हे पंतप्रधानांनी पुराव्यानिशी सांगितले आहे.
काँग्रेसच्या महाराष्ट्रातील सोलापूर येथील खासदार प्रणिती शिंदे यांनी ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेत सहभाग घेतला. यावेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूरवर बोलत असताना म्हटले की, ऑपरेशन सिंदूर हे नाव ऐकल्यानंतर यातून देशभक्ती दिसते. मात्र वास्तवात हा सरकारने मीडियावर केलेला एक तमाशा होता. या ऑपरेशनमधून काय साध्य झाले, हे कोणीही सांगत नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App