प्रतिनिधी
मुंबई : Devendra Fadnavis राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे आज सूप वाजले. दोन्ही सभागृहांत सध्या संविधानावर चर्चा करण्यात आली. या चर्चेत सत्ताधारी व विरोधकांनी एकमेकांवर शेलक्या शब्दांत टीका करून संविधानाचे महत्त्व पटवून दिले. या अधिवेशनात जागतिक महिला दिन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशतकोत्तर वर्षानिमित्त मांडण्यात आलेल्या प्रस्तावावर चर्चा झाली. तसेच भारतीय गणराज्याच्या 75 व्या वर्षानिमित्त भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृतमहोत्सवी वाटचाल या विषयावर चर्चा घेण्यात आली. आता विधानसभेचे पुढील अधिवेशन सोमवार 30 जून 2025 रोजी होणार आहे.Devendra Fadnavis
अधिवेशन सत्र कालावधीतील कामकाजाची आकडेवारी एकूण बैठकींची संख्या – 16 प्रत्यक्ष झालेले कामकाज – 146 अन्य कारणांमुळे वाया गेलेला वेळ – 1 तास 25 मिनिटे मंत्री उपस्थित नसल्याने वाया गेलेला वेळ – 20 मिनिटे रोजचे सरासरी कामकाज – 9 तास 7 मिनिटे तारांकित प्रश्न प्राप्त प्रश्न – 6 हजार 937 स्वीकृत प्रश्न – 491 उत्तरीत झालेले प्रश्न – 76
अल्पसूचना प्रश्न प्राप्त प्रश्न – 14 अस्वीकृत – 13 संमिलित – 1
अल्पकालीन चर्चा प्राप्त सूचना – 2, मान्य – 1, अमान्य – 1 एकूण प्राप्त लक्षवेधी सूचना – 2 हजार 557 स्वीकृत सूचना – 442 चर्चा झालेल्या सूचना – 129
नियम 97 अन्वयेच्या सूचना प्राप्त सूचना – 60 मान्य – निरंकर चर्चा झाली – निरंकर
शासकीय विधेयके प्रस्तापित – 9 संमत – 9 विधान परिषद संमत – 3
अशासकीय विधेयके प्राप्त सूचना – 42 मान्य – 22 प्रस्तापित – 22 विचारात घेतलेली – निरंक संमत – निरंक
शासकीय ठराव प्राप्त सूचना – 2 मान्य – 2 चर्चा झाली – 2
नियम 293 अन्वये प्रस्ताव प्राप्त सूचना – 5 मान्य – 5 चर्चा झाली – 5
अर्धातास चर्चा प्राप्त सूचना – 54 स्वीकृत – 42 चर्चा झाल्या – 3
सार्वजनिक महत्त्वाच्या बाबींवर प्राप्त सूचना – 209 मान्य सूचना – 48 चर्चा झाली – 3
अशासकीय ठराव प्राप्त सूचना – 151 मान्य – 94 चर्चा झाली – 2
अभिनंदनपर प्रस्ताव – 4
संविधान पूर्णतः भारतीय तत्त्वांवर तयार झाले -फडणवीस
देवेंद्र फडणवीस म्हणाले, भारताचे संविधान हे 10-12 देशांच्या संविधानातील गोष्टींपासून तयार झाल्याचा आरोप करतात. पण तसे नाही. हे पूर्णतः भारतीय तत्वांवर तयार करण्यात आलेले संविधान आहे. संविधान सभेमध्ये भारताच्या ध्वजावर चर्चा सुरू होती, तेव्हा राधाकृष्णन म्हणाले, जोवर आपण सद्गुणांवर चालत नाही, तोवर आपण पवित्रतेचे ध्येय साध्य करू शकत नाही किंवा सत्यही गाठू शकत नाही. अशोक चक्र हे कायद्याचे व धर्माचे चक्र आहे. सत्य गाठायचे असेल तर धर्माच्या वाटेनेच जावे लागेल. त्यामुळे या ध्वजाखाली जो काम करेल, सत्य व धर्म त्याचे आचरणाचे तत्व असले पाहिजे.
धर्म हे सातत्याने पुढे जाणारे गतिमान असे चक्र आहे. यापूर्वीच्या काळात आपल्याला जो त्रास सहन करावा लागला, तो बदलांना प्रतिकार केल्यामुळे… आपल्यापुढे अनेक आव्हाने आहेत. काळाच्या बरोबरीने चालण्याचे धैर्य आपण दाखवले नाही तर आपण मागे राहू. जात, अस्पृश्यता हे जोपर्यंत आपण त्यागत नाही, तोवर आपण सत्य व सद्गुणांचा वारसा सागू शकत नाही. हे चक्र आपल्याला हेच सांगते की, एका ठिकाणी थांबलो की एकेठिकाणी थांबलो तर मृत्यू आहे, ते चक्र सतत फिरत राहिले तर तिथेच जिवन आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
विषमता दूर होईपर्यंत आरक्षण राहील – फडणवीस
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानात 50 वर्षांसाठी आरक्षण दिले होते. त्यावेळी त्यांना असे वाटले होते की, 50 वर्षांत हा देश आपली विषमता संपवू शकेल. दुर्दैवाने आमच्या समाज व्यवस्थेने ही विषमता दूर केली नाही. त्यामुळे पहिल्यांदा अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्याला मुदतवाढ देण्यात आली. नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने या आरक्षणाला मुदतवाढ दिली.
या प्रकरणी जोपर्यंत ही विषमता आहे, तोपर्यंत आम्ही संधीची समानता हे जे काही आपले संवैधानिक मूल्य आहे, त्या मूल्यांप्रती सगळे समानस्तरावर येईपर्यंत हे आरक्षणच कायमच ठेवावे लागेल हे देखील या निमित्ताने आपण मान्य केले पाहिजे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App