नाशिक : गणपतीच्या पहिल्या दिवशी झाली बंधूंची भेटीगाठी; पण फोटोला पोज देताना घातली हाताची घडी!!, असेच चित्र ठाकरे बंधूंच्या आजच्या तिसऱ्या भेटीवरून दिसून आले. गणेश चतुर्थीच्या दिवशी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थावर गणपतीच्या दर्शनाला गेले. त्यांच्याबरोबर नेहमीप्रमाणे अर्थातच रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हेही होते. दोन्ही बंधूंनी एकमेकांचे कुशल मंगल विचारले. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी राज ठाकरे यांनी बसविलेल्या गणपतीचे दर्शन घेतले. पण प्रबोधनकार, बाळासाहेब आणि श्रीकांत ठाकरे यांच्या चित्रासमोर फोटोला पोज देताना दोन्ही बंधूंनी आपापली हातांची घडी घातलेली दिसली.The brothers met on the first day of Ganpati
गेला संपूर्ण महिना ठाकरे बंधूंच्या ऐक्यामुळे गाजला. तब्बल 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले. ते भावनिक दृष्ट्या एकत्र आले की राजकीय दृष्ट्या एकत्र आले, याची चर्चा महाराष्ट्रात गरजली गेली. मराठी माध्यमांनी देखील त्या चर्चेला मोठे खतपाणी घातले. ठाकरे बंधू एक झाले म्हणजे जणू काही त्यांनी महाराष्ट्र जिंकला आणि बाकीचे पक्ष गारद केले, अशी वातावरण निर्मिती माध्यमांनी केली. ठाकरे बंधूंच्या ऐक्याचे मोठे इव्हेंट सादर झाले. मोठे ठाकरे बंधू भेटले तसेच धाकटे ठाकरे बंधूही भेटले. त्या भेटीला राष्ट्रीय पातळीवर ग्लॅमर मिळाले.
Mumbai: Former Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray, along with his family, visited the residence of MNS chief Raj Thackeray and offered prayers on the occasion of Ganesh Chaturthi. (Source: Aaditya Thackeray/X) pic.twitter.com/2Bc7zcJVjz — ANI (@ANI) August 27, 2025
Mumbai: Former Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray, along with his family, visited the residence of MNS chief Raj Thackeray and offered prayers on the occasion of Ganesh Chaturthi.
(Source: Aaditya Thackeray/X) pic.twitter.com/2Bc7zcJVjz
— ANI (@ANI) August 27, 2025
बेस्टच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचे ऐक्य असफल
पण प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात मात्र ठाकरे बंधूंचे ऐक्य फारसे सफल झाले नाही. बेस्ट कामगार पतपेढीच्या निवडणुकीतून हे चित्र समोर आले. बेस्ट कामगारांची पतपेढीची निवडणूक ठाकरे बंधूंच्या ऐक्याचे विजयात रूपांतर करू शकली नाही. त्यामुळे ठाकरे बंधूंनी ती निवडणूक एकदम “छोटी” ठरवली. त्या निवडणुकीत आपण एकत्र उतरलोच नव्हतो. कारण ती पक्षीय निवडणूकच नव्हती, अशी भूमिका नंतर ठाकरे बंधूंनी घेतली. पण बेस्ट निवडणुकीतल्या पराभवामुळे ठाकरे बंधू मुंबई आणि अन्य महापालिका निवडणुकांमध्ये एक येतील का आणि ते आले तरी त्यांना फायदा होईल का??, याची वेगळी चर्चा सुरू झाली.
फोटोला पोज देताना हाताची घडी
या पार्श्वभूमीवर गणेश चतुर्थीच्या दिवशी ठाकरे बंधूंची राज ठाकरे यांच्या निवासस्थानी तिसरी भेट झाली. या भेटीत दोन्ही भावांनी एकमेकांचे कुशल मंगल विचारले. दोन्ही कुटुंबीय एकमेकांना भेटले. मोदकाच्या प्रसादाची देवाणघेवाण झाली. त्यामुळे मराठी माध्यमांची गणेश चतुर्थी सार्थकी लागली. ठाकरे बंधूंची एकत्रित छबी टिपण्यासाठी माध्यमांची गर्दी उडाली. पण माध्यमांसाठी फोटोची पोज देताना ठाकरे बंधूंनी हाताची घडी घातली त्यांनी एकमेकांना शेक हँड केला नाही. एकमेकांचे हात हातात मिळवले नाहीत. त्यामुळे मराठी माध्यम आणि त्यांच्या बॉडी लँग्वेज विषयीची चर्चा सुरू करून महापालिका निवडणुकीत ते एकत्र राहतील की वेगवेगळे लढतील??,अशा पुड्या सोडायला सुरुवात केली. ठाकरे बंधूंच्या हाताच्या घडीने वेगळ्या चर्चेला फोडणी मिळाली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App