स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ‘आक्रोश पदयात्रा’ आजपासून पुन्हा झाली सुरू

मराठा आरक्षणास पाठींबा देत आक्रोश पदयात्रा  स्थगित केली होती. 

विशेष प्रतिनिधी

सांगली : मराठा आरक्षणास पाठींबा देत स्थगित करण्यात आलेली स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आक्रेश पदयात्रा आजपासून पुन्हा सुरू झाली आहे. साखराळे येथील राजारामबापू सहकारी साखर कारखान्यापासून  ही यात्रा आज सकाळी पुन्हा एकदा सुरू करण्यात आली. The Akrosh Padayatra of Swabhimani Shetkari Sanghatana has started again from today

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मागील हंगामातील ४०० रुपये मिळावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. कर्नाटकातील सदलगा येथे उसाच्या फडात जाऊन ऊसतोड बंद पाडत, रोष व्यक्त केला आहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ४०० रूपयाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदार व शेतकरी संघटना प्रतिनिधींची जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.मात्र यामध्येही मार्ग निघाला नसल्याने आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखानदाराविरुद्ध आक्रमक धोरण स्वीकारले आहे.

या अगोदर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू  केलेल्या उपोषणास पाठींबा म्हणून राजू शेट्टी यांनी  २२ दिवसाची ५२२ किलोमीटरची आक्रोश यात्रा १३ व्या दिवशी स्थगित केली होती.

The Akrosh Padayatra of Swabhimani Shetkari Sanghatana has started again from today

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात