विशेष प्रतिनिधी
पुणे : लोहगाव विमानतळावरून जाणाऱ्या एका विमानाचा टायर फुटल्यामुळे विमानांच्या उड्डाणावर मोठा परिणाम झाला आहे. ही घटना आज (बुधवारी) दुपारी एकच्या सुमारास घडली. The airline was shut down due to a flat tire
यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. लोहगाव विमानतळावर उड्डाण करत असतानाच एका विमानाचा टायर फुटला. त्यामुळे धावपट्टी देखील खराब झाली आहे. त्यामुळे विमानतळ प्रशासनाने तत्काळ विमानसेवा बंद केली आहे. परिणामी, प्रवाशांना आता विमानतळावरच थांबावे लागत आहे. त्यामुळे विमानतळ परिसरात प्रचंड गर्दी झाली आहे.
नियोजित शेड्युलवर परिणाम
विमानतळाचे दिवसाचे ७० ते ८० विमान उड्डाणांचे शेड्युल ठरलेले असते. मात्र, या घडलेल्या घटनेमुळे पूर्ण शेड्युलवर परिणाम होणार आहे. याचा फटका विमानतळ प्रशासनासोबतच सर्वाधिक प्रवाशांनाच बसणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App