प्रतिनिधी
मुंबई : पत्राचाळ जमीन घोटाळ्यात आर्थर रोड मध्ये ईडीच्या न्यायालयीन कोठडीत ठेवलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांना भेटण्यासाठी गेलेल्या एका खासदार आणि दोन आमदारांना परवानगी नाकारल्याची माहिती आर्थर रोड जेल प्रशासनाने दिली आहे. शिवसेना नेत्यांना तसेच बंधू सुनील राऊत यांनाही जेल प्रशासनाने भेटीची परवानगी दिली नाही. The administration stopped MPs and MLAs who went to Arthur Road Jail to meet Sanjay Raut
आर्थर रोड जेल प्रशासनाने या नेत्यांना राऊतांना भेटण्यासाठी मनाई केली. बुधवारी सकाळी संजय राऊत यांचे धाकटे बंधू शिवसेना आमदार सुनील राऊत आणि शिवसेना सचिव- खासदार अनिल देसाई हे संजय राऊतांना भेटण्यासाठी जेलमध्ये गेले होते. मात्र तुरूंग प्रशासनाने त्यांना स्पष्ट शब्दात नकार दिला.
Sanjay Raut : राज ठाकरे पुन्हा म्हणाले, “लवंडे”; फडणवीस म्हणाले, “बिनकामाचे”!!
संजय राऊत हे पत्राचाळ प्रकरणातील एक आरोपी आहेत. ८ ऑगस्टपर्यंत त्यांना ईडीची कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर आता ईडी कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असून ते संजय राऊत हे सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहेत.
संजय राऊतांच्या वकिलाने न्यायालयात मागणी केली होती की, राऊतांना ईडीच्या कोठडीत ज्या काही परवानग्या दिल्या होत्या, त्या तुरूंगातही देण्यात याव्यात. त्यांना घरचे जेवण आणि औषध द्यावे. त्याचवेळी राऊतांचा हृदयविकाराचा त्रास असल्याने त्यांना तुरूंगाच्या कोठडीत घरचे जेवण देण्यात यावे आणि त्यांची औषधेही तुरंगात देण्यात यावी, असे न्यायालयाने म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App