विशेष प्रतिनिधी
मुंबई : Eknath Shinde शिवसेना चिन्ह प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सतत होणाऱ्या सुनावणीच्या पुढे ढकलण्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार राजकीय हल्ला चढवला आहे. मुंबई विमानतळावर सरन्यायाधीशांचे स्वागत करतानाचे फोटो शिंदेंनी सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर राऊत संतापले.Eknath Shinde
शिंदेंची पोस्ट रिपोस्ट करत राऊतांनी उपरोधिक टोला लगावला, “म्हणूनच तीन वर्षे तारीख पे तारीख!”Eknath Shinde
या एका ओळीनेच महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद पेटला आहे.
सुनावणी पुढे ढकलली, राजकीय तापमान वाढले
बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना चिन्ह प्रकरणासह राष्ट्रवादी काँग्रेस प्रकरणाची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली. न्यायालयीन प्रक्रिया रखडलेली असतानाच, एकनाथ शिंदे यांनी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या स्वागताचे फोटो पोस्ट केले.
शिंदेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, सरन्यायाधीश विशेष कार्यक्रमासाठी मुंबईत आले असून, विमानतळावर पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री आशिष शेलार आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर उपस्थित होते.
या पोस्टमुळे ठाकरे गटात तीव्र नाराजी पसरली आहे. शिवसेना चिन्हासारखा अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील खटला तीन वर्षांपासून प्रलंबित असताना, सत्ताधाऱ्यांकडून केलेल्या अशा पोस्टमुळे संशय निर्माण होत असल्याचा आरोप राऊत आणि ठाकरे गटातील नेत्यांकडून केला जात आहे.
शिवसेना चिन्ह प्रकरणाचा निकाल कधी लागणार, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. मात्र सुनावणी लांबत असतानाच ठाकरे गट आणि शिंदे गटातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होत चालला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App