नाशिक : महाराष्ट्राच्या हितासाठी टाळी आणि हाळी; खरं तर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वासाठी हात मिळवण्याची तयारी!! हा असला प्रकार राज ठाकरे यांच्या मुलाखतीनंतर आज अचानक सुरू झाला. राज ठाकरेंनी महेश मांजरेकर यांना मुलाखत दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी ताबडतोब प्रतिक्रिया देऊन महाराष्ट्राच्या हितासाठी शिवछत्रपतींची शपथ घेऊन टाळी देण्याची हाळी द्या, पण भाजपला दूर ठेवा, अशी अट घातली. त्यामुळे महाराष्ट्रात राज आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची पुन्हा चर्चा सुरू झाली.
वास्तविक दोन्ही ठाकरे बंधू राजकीय दृष्ट्या अलग झालेल्या याला १५ वर्षे उलटून गेली. त्यानंतर मुंबईच्या अस्तित्वात असलेल्या आणि नसलेल्या चारही नद्यांमधून भरपूर राजकीय पाणी वाहून गेले. यादरम्यान उद्धव ठाकरे अगदी मुख्यमंत्री सुद्धा होऊन गेले, शिवसेना फुटली. पण दोन्ही ठाकरे बंधू आता अशा वळणावर आलेत की त्यांना स्वतःच्या राजकीय अस्तित्वाचा लढा द्यायची वेळ आलीये आणि म्हणूनच एकत्र येण्याची टाळी आणि हाळी देण्याची भाषा सुरू झालीय.
मुंबईसह महाराष्ट्रातल्या इतर महापालिका निवडणूकांमध्ये ठाकरे बंधूंच्या दोन्ही पक्षांना जर यश आले नाही, तर दोघांचेही राजकीय अस्तित्व मिटेल, याची जाणीव झाल्यानंतरच ही टाळी आणि हाळीची भाषा सुरू झाली. अन्यथा जोपर्यंत उद्धव ठाकरेंना भाजप किंवा काँग्रेस – राष्ट्रवादीचा राजकीय आश्रय होता किंवा राज ठाकरे यांना वारंवार अपयशाचा सामना करावा लागला नव्हता, त्यावेळी ही टाळी आणि हाळी अशी भाषा फारशी जोरात उच्चारली गेली नव्हती. राज ठाकरे यांच्याकडून अधून मधून टाळी देण्यासाठी हात पुढे केले गेले होते, पण उद्धव ठाकरे यांनी मात्र ते त्या त्या वेळी झिडकारूनच टाकले होते.
टाळी देण्याचा प्रत्येक वेळी प्रस्ताव राज ठाकरे यांच्याकडून कुणीतरी दिला होता. अगदी मुलाखतींमधून देखील राज ठाकरे यांनी त्याचा पुनरुच्चार केला होता, पण उद्धव ठाकरेंनी मात्र त्यावेळी प्रतिसादच दिला नव्हता. पण त्यावेळच्या आणि आत्ताच्या राजकीय टाइमिंग मध्ये एवढा फरक पडलाय की, दोन्ही ठाकरे बंधूंना अस्तित्वासाठी एकत्र यावेसे वाटायला लागलेय. म्हणूनच टाळी आणि हाळीचे राजकारण त्या दोघांनी एकदम सुरू केलेय. राज ठाकरेंनी दिलेल्या मुलाखतीला उद्धव ठाकरे यांनी लगेच प्रतिसाद दिलाय. म्हणून दोन्ही बाजूंनी खुशीच्या प्रतिक्रियांचा पाऊस देखील पडलाय. पण…
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App