महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली राजकीय अपरिहार्यता आणि ठाकरे बंधूंच्या पक्षांना निर्माण झालेला राजकीय अस्तित्वाचा धोका या संमिश्र राजकीय वातावरणाचा परिणाम म्हणून एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंच्या मध्ये पुन्हा एकदा बेबनावाची काडी घालणे म्हणजे मनसेला संभाजी ब्रिगेड आणि वंचित आघाडीच्या पंक्तीत बसविण्याचे व्हिडिओ बनविणे होय, असे म्हणायचे वेळ ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी केलेल्या ताज्या व्हिडिओच्या निमित्ताने आली.
कारण भाऊंनी उद्धव ठाकरे यांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत उद्धव ठाकरे हे मनसेला संभाजी ब्रिगेड आणि वंचित आघाडी यांच्या पंक्तीत बसवणार का??, असा सवाल केला. पण या सवालाच्या मागे फार मोठे राजकीय इंगित दडले आहे, ते म्हणजे ठाकरे बंधूंच्या ऐक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या काड्या घालत राहणे ही भाजप आणि एकनाथ शिंदे यांची राजकीय गरज आहे.
कारण ज्या राजकीय वातावरणात ठाकरे बंधू अपरिहार्यपणे एकत्र येत आहेत, ही त्यांची सर्वांत मोठी राजकीय गरज आहे. ठाकरे बंधू आज एकत्र आले, तर ठीक अन्यथा दोन्ही बंधू एकत्र येण्याच्या स्थितीत देखील राहणार नाहीत, अशी राजकीय परिस्थिती महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर उद्भवू शकते. याची जाणीव दोन्ही ठाकरे बंधूंना झाल्यानंतर त्यांनी एकीचे दमदार, पण सावध पाऊल टाकले. त्यांची ही दमदार आणि सावध पावले बघून शिवसैनिक आणि मनसैनिक यांना स्फूरण चढले आणि त्यांनी परस्पर वेगवेगळ्या शहरांमध्ये संयुक्त कार्यक्रम आयोजित केले. सुरुवातीला low key केलेले कार्यक्रम नाशिकमध्ये दोन्ही पक्षांच्या संयुक्त मोर्चाच्या भव्य उपक्रमामध्ये परावर्तित झाले. त्यामुळे एक प्रकारे ठाकरे बंधूंवरच दोन्ही पक्षांमधून एकही टिकवण्याचा दबाव वाढलेला दिसतो.
या पार्श्वभूमीवर भाऊंनी उद्धव ठाकरे हे मनसेला संभाजी ब्रिगेड आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या पंक्तीत बसवणार का??, असा असा सवाल करून भाऊंनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांना अपेक्षित असलेली बेकीची काडी शिवसेना आणि मनसे यांच्यात टाकून दिली.
– फक्त नेत्यांची होती आघाडी
पण मूळातच संभाजी ब्रिगेड आणि वंचित बहुजन आघाडी आणि एकत्रित शिवसेना यांचा political DNA भिन्नभिन्न असताना एका वेगळ्या परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरेंनी दोन्ही पक्षांची आघाडी केली होती. ही आघाडी फक्त नेत्यांची होती. शिवसैनिक किंवा संभाजी ब्रिगेड आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातल्या कार्यकर्त्यांची बिलकुल नव्हती. कारण मूळातच शिवसेना, संभाजी ब्रिगेड आणि वंचित बहुजन आघाडी यांचे राजकीय दृष्ट्या पटणे शक्यच नव्हते. कारण या तीनही पक्षांची राजकीय तत्त्वज्ञाने आणि कार्यशैली एकमेकांपासून भिन्न एकमेकांच्या विरोधी आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर आणि संभाजी ब्रिगेड यांचे नेते यांनी वेगवेगळ्या केलेली आघाडी खऱ्या अर्थाने कधी अस्तित्वातच येऊ शकली नाही आणि तिचा राजकीय परिणाम देखील कधीही झाल्याचे दिसले नाही.
– ठाकरे बंधूंचा DNA समान
त्या उलट दोन्ही ठाकरे बंधूंच्या राजकीय तत्त्वज्ञानाचा DNA नुसता समान नाही, तर तो एकच आहे. मराठी आणि हिंदुत्वाचा मुद्दा हा त्यांच्या घरातला comman factor आहे. त्यामुळे ठाकरे बंधू राजकीय अपरिहार्यते पोटी एकत्र आले असले, तरी मूळातच शिवसैनिक आणि मनसैनिक यांचाही political DNA अत्यंत समान आहे किंबहुना एकच आहे. त्यामुळे त्यांच्यातले राजकीय तत्त्वज्ञान आणि त्यांची राजकीय कार्यशैली याच्यामध्ये कुठलीही भिन्नता संभवतच नाही. उलट ठाकरे बंधूंचे ऐक्य हे केवळ कौटुंबिक ऐक्य न राहता दोन पक्षांचे एकजन्सीत्व तयार होईल. किंबहुना तशा राजकीय खुणा नाशिकच्या संयुक्त मोर्चातून दिसून आल्या.
– विरोधकांची सगळी space खाणे शक्य
दोन्ही ठाकरे बंधू कौटुंबिक पातळीवर एक होणे आणि पक्ष म्हणून युती करून एकत्र येणे यातून सत्ताधारी बळकट भाजपला बळकट आव्हान निर्माण होणे किती शक्य होईल हा भाग अलहिदा, पण दोन्ही ठाकरे बंधू आणि शिवसेना आणि मनसे यांची युती काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची politacl space संपवून टाकण्याइतपत बळकट होईल याविषयी शंका बाळगण्याचे कारण नाही. कारण ठाकरे बंधूंच्या ऐक्यामधून निर्माण होणारी ताकद भाजपची मते खेचून घेण्याची शक्यता नाही, पण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची मते आणि त्याचबरोबर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तसेच काँग्रेसची मते आपल्याकडे खेचून घेऊन एक स्वतंत्रच वेगळी ताकद निर्माण होऊ शकते. कारण ही ताकद फक्त ठाकरे बंधूंची नसेल, तर ती शिवसैनिक आणि मनसैनिकांची एकत्रित ताकद असेल.
– अवसानघात नको
त्यामुळे उद्धव ठाकरे हे मनसेला संभाजी ब्रिगेड आणि वंचित बहुजन आघाडीच्या पंक्तीत बसवणार का??, या सवालाच्या निमित्ताने भाऊंनी काडी घातली असली, तरी तिचा आघात समजून घेतला पाहिजे. उद्धव ठाकरेंनी मनसेला संभाजी ब्रिगेड आणि वंचित आघाडीच्या पंक्तीत बसविणे हे शिवसैनिक आणि मनसैनिकांचा अवसानघात ठरेल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App