0 + 0 = 0; पण आयातवीरांची बेरीजही अपूर्ण; हेच बेस्ट निवडणुकीच्या निकालाचे खरे चित्र!!

नाशिक : 0 + 0 = 0; पण आयातवीरांची बेरीजही अपूर्ण; हेच बेस्ट निवडणुकीच्या निकालाचे खरे चित्र!!, असे म्हणायची वेळ ठाकरे बंधूंच्या पराभवाने आणि त्या पाठोपाठ भाजपच्या आयातवीर नेत्यांनी केलेल्या जल्लोषामुळे आली आहे.

15123 मतदार असलेल्या बेस्ट कामगार पतपेढीच्या निवडणुकीत 12656 मतदारांनी मतदान करून ठाकरे बंधूंच्या ऐक्याचा फुगा फोडला. ठाकरे बंधूंच्या पॅनलचा एकही उमेदवार निवडून दिला नाही. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या ऐक्याची लिटमस टेस्ट फेल गेली. ठाकरे ब्रँडला एका छोट्या निवडणुकीत मोठा धक्का लागला.

बेस्ट पतपेढीची निवडणूक म्हणजे जणू काही महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आहे किंवा मुंबई महापालिकेची निवडणूक आहे, असा आव मराठी माध्यमांनी आणि ठाकरे बंधूंनी आणला होता. ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे या निवडणुकीत फार मोठी “क्रांती” घडेल. महाराष्ट्रात फार मोठे परिवर्तन होईल, अशा बाता शिवसेना + मनसे यांच्या कार्यकर्त्यांनी आणि मराठी माध्यमांनी मारल्या होत्या. प्रत्यक्षात बेस्ट पतपेढीच्या मतदारांनी या सगळ्यांना जोरदार चपराक हाणली. ठाकरे बंधूंच्या पॅनल चा एकही उमेदवार निवडून दिला नाही.

– भाजपच्या आयातवीर नेत्यांना आनंदाची उकळी

ठाकरे बंधूंच्या ऐक्याचा असा पराभव झाल्यानंतर भाजपच्या नेत्यांना आनंदाची उकळी फुटली. प्रसाद लाड, केशव उपाध्ये वगैरे नेत्यांनी आपल्या सोशल मीडिया हँडल वर पोस्ट लिहून ठाकरे बंधूंच्या ऐक्याचा धुव्वा उडविला. 0 + 0 = 0, बेरीज दोन 0 एकत्र आले तरी त्यांची बेरीज 0 होते. त्यापुढे कितीही 0 जोडले तरी काही फरक पडत नाही, असा टोमणा प्रसाद लाट यांनी हाणला. त्याचीच वेगळी पुनरावृत्ती केशव उपाध्ये यांनी केली.



पण भाजपच्या नेत्यांची ही आनंदाची उकळी फक्त ठाकरे बंधूंच्या पराभवापुरती मर्यादित ठरली. कारण बेस्टच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा पराभव करण्यासाठी भाजपने “आयातवीर” नेत्यांची फौज तैनात केली होती. प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल उभे केले होते. पण त्या पॅनेलला देखील बेस्ट पतपेढीच्या मतदारांनी पुरता प्रतिसाद दिला नाही.

प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांनी उभ्या केलेल्या पॅनलचे फक्त 7 उमेदवार निवडून येऊ शकले. त्यामुळे भाजपच्या “आयातवीर” नेत्यांची बेरीज देखील अपूर्णांकाची ठरली. बेस्ट पतपेढीची सत्ता भाजपला मिळू शकली नाही. त्याऐवजी मराठी माध्यमांनी ज्यांचे पॅनल चर्चेत देखील ठेवले नव्हते, त्या शशांक राव यांच्या पॅनलने ठाकरे बंधू आणि भाजप या दोघांच्याही पॅनेलचा दणकून पराभव केला.

या निवडणुकीत पैसे वाटप मतदानाची हेराफेरी वगैरे आरोप झाले, पण ठाकरे बंधू आणि भाजप या दोघांचेही पॅनल निवडून येऊ शकले नाही. त्यामुळे 0 + 0 = 0 हे जसे खरे ठरले, तसेच भाजपच्या आयात निर्णय त्यांची बेरीजही अपूर्ण ठरली, हे राजकीय वास्तव समोर आले.

Thackrey brothers and imported BJP leaders lost BEST election

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात