महाविकास आघाडी सोडण्याची ठाकरेंची धमकी, पवारांचे फोनही ठाकरेंनी घेतले नाहीत!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : विधान परिषद निवडणुकीत महायुतीने त्यांचे सगळेच्या सगळे 9 उमेदवार निवडून आणले. महाविकास आघाडीचे २ उमेदवार जिंकले, पण शरद पवारांना आपणच पाठिंबा जयंत पाटील यांना निवडून आणता आले नाही. याचे पडसाद महाविकास आघाडीत उमटून आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली. यातून निवडणुकीत “आतमध्ये” घडलेल्या घडामोडी आता उघड्यावर येऊ लागल्या आहेत. आपले उमेदवार मिलिंद नार्वेकर पराभूत झाल्यास महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिला होता, अशी माहिती आता समोर आली आहे. इतकेच काय पण या निवडणुकी दरम्यान शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला, पण उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांचे फोन देखील घेतले नाहीत, ही धक्कादायक बातमी देखील आता उघड झाली आहे. Thackeray’s threat to leave Mahavikas Aghadi, Thackeray did not take Pawar’s calls either

विधान परिषद निवडणुकीपूर्वी झालेल्या बैठकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, उमेदवार जयंत पाटील, शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांच्यात बैठक झाली. या बैठकीला शेकापच्या जयंत पाटील यांचे पुतणे निनाद पाटील हे देखील उपस्थित होते. काका जयंत पाटील यांच्याविरोधात शिवसेना कट रचत असल्याचा आरोप निनाद पाटील यांनी केला. त्यामुळे मतदानापूर्वी महाविकास आघाडीत संघर्ष पेटला. ‘मुंबई तक’नं सूत्रांच्या हवाल्याने याची बातमी दिली.

विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल उमेदवार मिलिंद नार्वेकरांच्या विरोधात गेल्यास महाविकास आघाडी सोडू, अशी धमकीच उद्धव ठाकरेंनी दिली होती. विधान परिषदेच्या निवडणुकीचं मतदान होण्यापूर्वी शरद पवारांनी उद्धव ठाकरेंशी संपर्क साधण्यासाठी अनेकदा फोन केले. पण ठाकरेंनी त्यांच्या फोनला उत्तर दिले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

उद्धव ठाकरेंचे उमेदवार मिलिंद नार्वेकरांना पहिल्या पसंतीची 22 मते मिळाली. त्यात काँग्रेसच्या 7 मतांचा समावेश आहे. या 7 मतांसाठी ठाकरेंना बराच संघर्ष करावा लागला. ठाकरेंना कोण कोण मतदान करणार, त्या आमदारांची यादी काँग्रेसनं ठाकरेंना दिली. त्यात मोहनराव हंबर्डे, सुलभा खोडके, कुणाल पाटील, शिरीष चौधरी या आमदारांच्या नावांचा समावेश होता. या आमदारांची मतं फुटतील आणि नार्वेकर पराभूत होतील, अशी भीती ठाकरेंनी होती.

विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसला अतिरिक्त मतं मिळाली. अजित पवारांच्या दुसऱ्या उमेदवाराला धोका असताना त्यांचा उमेदवार पहिल्या फेरीत जिंकून आला. दोन्ही उमेदवारांनी मिळून अधिकची 5 मतं घेतली. ही मतं काँग्रेस आमदारांची असल्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनीच पक्षाचे 3 – 4 आमदार क्रॉस व्होटिंग करतील अशी शक्यता बोलून दाखवली होती.

पण काँग्रेसचे फक्त एकच मत फुटले. बाकीची मते ठरल्याप्रमाणे मिलिंद नार्वेकरांनाच गेली. त्यामुळे मिलिंद नार्वेकर दुसऱ्या फेरीत का होईना पण विजयी झाले. त्यामुळे उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतच राहिले. ते आघाडीतून
बाहेर पडले नाहीत.

पण या सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी शरद पवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्याचे फोनही घेतले नाहीत. उलट त्यांनी पाठिंबा दिलेला उमेदवार पाडला. त्यामुळे महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंचे वर्चस्व सिद्ध झाले.

Thackeray’s threat to leave Mahavikas Aghadi, Thackeray did not take Pawar’s calls either

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात