संपलेला नाणं – खणखणीत नाणं : मोदी – बाळासाहेबांना परस्परविरोधी ठरवण्याची ठाकरेंची नवी राजकीय खेळी

  • पण फडणवीसांचे ठाकरेंना खणखणीत प्रत्युत्तर!!

प्रतिनिधी

मुंबई : शिवसेनेतल्या नावाची आणि निवडणूक चिन्हाची लढाई आता संपलेलं नाणं विरुद्ध खणखणीत नाणं या विषयावर आली आहे. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख संपलेला नाणं असा करून भाजपला डिवचल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे. Thackeray’s new political ploy to make Modi – Balasaheb contradictory

उद्धव ठाकरे यांनी शिवसेना हे नाव गमावल्यानंतर आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण गोठवल्यानंतर आपल्या गटाच्या नेत्यांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी आपली ही शेवटची निवडणूक आहे असे समजून लढा. आपण जिंकलो की सगळं काही मिळवलं, असे उद्गार काढले. त्याच वेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नोटबंदी नंतर घासलेलं आणि संपलेलं नाणं आहे. पण आपल्याकडे बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा खणखणीत नाणं आहे, असेही उद्गार काढले.

या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. बाळासाहेब ठाकरे आमच्यासाठी कायमच वंदनीय राहतील. पण त्यांनी शिवसेनेचे 56 आमदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून निवडून आणले होते. मोदी हे नाणं त्यावेळी चाललं. आता चालतं आणि भविष्यातही चालतच राहील, असे उद्गार काढून फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले.

एकूण शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटांमध्ये जिंकलेली ही लढाई संपलेलं नाणं आणि खणखणीत नाणे या विषयांवर आली आणि ज्या दोन मोठ्या नेत्यांनी हिंदुत्ववादासाठी आपले जीवन वेचले, त्या बाळासाहेब ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांना परस्पर विरोधी ठरवून उद्धव ठाकरे यांनी नवी राजकीय खेळी करू पाहात आहेत. पण पहिल्या झटक्यात त्यांना फडणवीस आणि तितकेच सणसणीत प्रत्युत्तर देखील दिले आहे.

Thackeray’s new political ploy to make Modi – Balasaheb contradictory

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात