विशेष प्रतिनिधी
मुंबई : मातोश्रीच्या बंद खोलीतली चर्चा बऱ्याच कालावधीनंतर विधिमंडळाच्या लिफ्ट मध्ये झाली. त्यामुळे महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातला पहिला दिवस गाजला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी फटकेबाजी करत ठाकरेंची लिफ्ट कधीही सहाव्या मजल्यावर पोहोचू शकणार नाही, असा टोला उद्धव ठाकरेंना हाणला Thackeray’s lift will not reach the sixth floor; Whipping of the Chief Minister!!
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस विधानभवनाच्या लिफ्टमध्ये हे दोन नेते योगायोगानं एकत्र आले. परिस्थिती ओळखून दोघंही एकमेकांशी सौहार्दानं बोलले. मात्र राजकीय वर्तुळात आणि तज्ज्ञांमध्ये लगेचच चर्चांना उधाण आले आहे. आता या भेटनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. त्यांची लिफ्ट सहाव्या मजल्यापर्यंत (मंत्रालयाचा सहावा मजल्यावर मुख्यमंत्र्यांचे दालन आहे) पोहचू शकत नाही, असा टोला लगावला आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
विधानसभा निवडणुका तीन महिन्यांवर आल्या आहेत, महायुती आणि मविआतलं जागावाटप अजून व्हायचं आहे. लोकसभेत भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर योयायोगानं झालेल्या या भेटीला प्रचंड महत्त्व आलं आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, त्यांनी लिफ्ट मागितली तरी ती लिफ्ट सहाव्या मजल्यापर्यंत पोहचू शकत नाही. दोन वर्षापूर्वी ते काँग्रेसच्या लिफ्टमध्ये शिफ्ट झाल्याने आम्ही जनतेच्या लिफ्टमध्ये आलो. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील सरकार आम्ही स्थापन केले. लिफ्टमध्ये गेल्याने ते युतीत येणार, असे होत नाही.
खोके सरकारच्या निरोपाचं हे अधिवेशन असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली. यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हे अधिवेशन निरोपाचे नाही तर निर्धाराचे आहे. निरोप कोण कोणाला देईल ते जनता ठरवेल.
लंडनमधल्या पंचताराकीत हॉटेलपेक्षा पंचतारांकीत शेत केव्हाही बरी : मुख्यमंत्री
मुख्यमंत्र्यांची फाईव्हस्टार शेती, अमावस्या – पौर्णिमेला वेगळं काहीतरी पीक काढतात, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला होता. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, लंडनमधल्या पंचताराकीत हॉटेलपेक्षा पंचतारांकीत शेती केव्हाही बरी आहे. शेतकऱ्याने पंचतारांकीतकरू नये का? चांगली नगदी पिके घेऊ नये का? स्ट्रॉबेरी, ड्रॅगन फ्रुट लावू नये का? त्यांच्याच डोक्यात अमावस्या पौर्णिमा आहे. ते लिंबू मिरचीवाले आहेत. पण माझ्याकडे सर्व प्रकारची फळे आहेत.
शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. त्यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, शेतकऱ्यांच्या बांधावर जाणारे आम्ही आहोत. त्यांनी बांद्रा ते बांधा कधी पाहिले नाही. त्यांना शेतकऱ्यांचे दु:ख कसे कळणार? त्यासाठी शेतात जावे लागते,चिखल तुडवावा लागतो. घरात बसून कसे कळणार आहे. शेतीच्या बाबतीत वर्क फ्रॉम होम चालत नाही. तिथे वर्क फ्रॉम फिल्ड चालते.
महायुतीत अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा आहे. यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी थेट उत्तर दिले नाही. मुख्यमंत्री म्हणाले, आमचे महायुतीचे काम व्यवस्थीत सुरू आहे. महायुती मजबुतीने काम करत आहे. महाविकास आघाडीबद्दल विचारु नका, आमचे काम व्यवस्थित सुरू आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App