नाशिक : “लाल संविधानी” कुणाल कामराभोवती लिबरल लोकांचा प्रचंड जमावडा; तरीही समोरून लढण्याऐवजी तो पळून का गेला??, असा सवाल हातात लाल संविधान फडकावून स्टॅन्ड अप कॉमेडी करणाऱ्या कुणाल कामराच्या पळून जाण्यामुळे समोर आलाय!!
कुणाल कामराने मुंबईच्या खार मधल्या हॅबिटॅट स्टुडिओत हातात लाल संविधान धरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विडंबन काव्य सादर केले. त्यानंतर त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर देखील विडंबन काव्य केले. हे सगळे केल्यानंतर त्याने हातात पुन्हा लाल संविधानाचे पुस्तक धरून आपण या संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार बोलतो आणि काम करतो असे सांगत पोलिसांना आपल्यावर कारवाई करण्याचेच आव्हान दिले. यावेळी त्याची स्टॅन्ड अप कॉमेडी ऐकायला आलेल्या लिबरल लोकांनी टाळ्या वाजवून त्याचे समर्थन केले. पण या सगळ्यामुळे एकनाथ शिंदेंचे शिवसैनिक भडकले आणि त्यांनी हॅबिटॅट स्टुडिओची तोडफोड केली. त्यामुळे कुणाल कामराविरुद्ध महाराष्ट्रात प्रचंड संताप उसळला. त्यानंतर देखील कुणाला कामरा थांबला नाही. त्याने लाल संविधान हातात धरून एक फोटो आपल्या x हॅण्डल वर पोस्ट केला. त्या फोटोवर The only way forward… असे लिहून आपण पुढे देखील लढाई लढू, असा अविर्भाव आणला.
The only way forward… pic.twitter.com/nfVFZz7MtY — Kunal Kamra (@kunalkamra88) March 23, 2025
The only way forward… pic.twitter.com/nfVFZz7MtY
— Kunal Kamra (@kunalkamra88) March 23, 2025
कुणालचा हा राणा भीमदेवी अविर्भाव बघून बरेच लिबरल लोक त्याच्या पाठीशी उभे राहिले. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत हे तर प्रचंड उत्साहात आलेच, पण त्यांच्या पाठोपाठ जया बच्चन, प्रियांका चतुर्वेदी, विजय वडेट्टीवार, नाना पटोले त्याचबरोबर बॉलीवूड मधले नेहमीच यशस्वी लिबरल कलाकार कुणाच्या समर्थनासाठी उभे राहिले. त्यांनी आपापली सोशल मीडिया हँडल्स कुणालच्यि समर्थनाने भरून काढली. त्यामुळे कुणालच्या कॉमेडी दंडांमध्ये बळ भरले गेले. आता या सगळ्या लिबरल लोकांच्या ताकदीच्या बळावर कुणाल सहज समोरून लढेल आणि अविष्कार स्वातंत्र्याची लढाई जिंकेल, असे चित्र समोर आले.
पण हातात लाल संविधान घेऊन फोटो x वर पोस्ट करणारा कुणाल प्रत्यक्षात भेदरट निघाला. आपल्या विडंबन काव्यावरून शिवसैनिकांमध्ये संताप उसळला, त्या पाठोपाठ महाराष्ट्रात संतप्त पडसाद उमटले हे पाहिल्याबरोबर तो परागंदा झाला. त्याने आपला फोन स्विच ऑफ करून टाकला. पोलीस त्याच्या शोधाच्या मागे लागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात कोणाच्या तथाकथित आविष्कार स्वातंत्र्याचा बुरखा फाडला. स्टँड अप कॉमेडी करून विडंबन करण्याचे आम्ही स्वागतच करू पण जनतेने निवडून दिलेल्यांचा अपमान करण्याचा अधिकार त्याला कोणी दिलेला नाही त्यामुळे कुणाल वर कायदेशीर दृष्ट्या कठोर कारवाई होईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यामुळे कुणाला आणखी घाबरला शेपूट घालून कुठल्या बिळात जाऊन लपला ते आता पोलीस शोधत आहेत.
हॅबिटॅट स्टुडिओ वर हातोडा
याच दरम्यान ज्या हॅबिटॅट स्टुडिओमध्ये कुणालने स्टँड अप कॉमेडी करून एकनाथ शिंदेंचा अपमान केला होता तिथे मुंबई महापालिकेचे पथक हातोडा घेऊन पोहोचले त्यांनी स्टुडिओ मधले बेकायदा बांधकाम फोडून टाकले. पण त्याआधी स्टुडिओच्या चालकांनी कोणाच्या स्टँड अप कॉमेडी वरून स्वतःचे हात वर केले होते, पण म्हणून त्यांचा स्टुडिओ काही कायद्याच्या कचाट्यातून वाचू शकला नाही. त्यावेळी देखील कुणाल स्टैंड अप कॉमेडीची जबाबदारी घ्यायला समोर आला नाही. तो शेपूट घालून कुठेतरी बिळात लपून बसला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App