मुंबईत ठाकरेच ठरले इतरांवर भारी; उमेदवारांच्या आकड्यांच्या हिशेबात मारली बाजी!!

Thackerays

नाशिक : महाराष्ट्रात सगळीकडे भाजपची दादागिरी सुरू असताना मुंबई महानगरात मात्र उद्धव ठाकरेच ठरले इतरांवर भारी, उमेदवारांच्या आकड्यांच्या हिशेबात इतर सगळ्या पक्षांवर मारली बाजी!!, हे राजकीय चित्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी समोर आले.Thackerays are much superior in Mumbai

महाराष्ट्रात 29 महापालिकांमध्ये भाजपने इतर सर्व पक्षांवर दादागिरी करून सगळ्यात जास्त उमेदवार उभे केले. त्यासाठी त्यांनी 14 महापालिकांमध्ये महायुती तोडली. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांना महायुतीतून वेगळे पाडले. भाजपने पहिल्यांदाच सगळ्या महाराष्ट्रात स्वबळ आजमायचे ठरविले.



 

पण मुंबईत मात्र भाजपला ते धाडस झाले नाही. भाजपने मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी जुळवून घेतले. एकनाथ शिंदे यांनी मुंबईत आपल्यासमोर कुठला अडथळा उभा करू नये म्हणून ठाण्यात सुद्धा भाजपने एकनाथ शिंदे यांच्या सोयीनुसार युती केली.

– उबाठा शिवसेना 163, मनसे 53

त्यामुळे मुंबईत उद्धव ठाकरेंची शिवसेना आकड्यांच्या हिशेबात सगळ्या पक्षांवर भारी ठरली. एकट्या मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 163 जागांवर उमेदवार उभे केले राज ठाकरे यांच्या मनसेला 53 जागा दिल्या.

– भाजप 137, शिंदे 90

भाजप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर युतीमध्ये आल्याने भाजपला 137 जागा वाट्याला आल्या. एकनाथ शिंदे यांना 90 जागा द्याव्या लागल्या. अजित पवारांनी 96 जागांवर राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर उमेदवार उभे केले. शरद पवारांची तुतारी नेमकी किती जागांवर दिसली, याचा आकडा सुद्धा अजून समोर आला नाही, पण तो नगण्य राहिला.

– काँग्रेस 149, वंचित 62

दुसरीकडे महाविकासाकडे काँग्रेस इतरांवर दादागिरी करणारा पक्ष ठरला. काँग्रेसने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दूर सारले. त्यांच्या ऐवजी त्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीशी युती करणे पसंत केले. काँग्रेसने 139 जागांवर उमेदवार उभे केले तर वंचित बहुजन आघाडीला 62 जागा दिल्या.

या सगळ्यांमध्ये शिवसेना नावाचा पक्ष मुंबईत किती रुजला आहे, हेच सिद्ध झाले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आकड्यांच्या हिशेबात तरी इतर सर्व पक्षांवर मात केली, हेच राजकीय वास्तव आज समोर आले.

– पवारांपेक्षा बाळासाहेब भारी

या आकड्यांचा हिशेब नीट पाहिला, बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार झालेल्या वेगवेगळ्या पक्षांमधल्या उमेदवारांची संख्या 306 भरली. त्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना 163, एकनाथ शिंदे यांची शिवसेना 90, तर राज ठाकरे यांची मनसे 53 यांचा समावेश राहिला. त्या उलट “पवार संस्कारितांची” संख्या 100 च्या आत आटोपली.

Thackerays are much superior in Mumbai

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात