काँग्रेसला प्रामाणिक मित्र संबोधत ठाकरेंची महाविकास आघाडी पासून स्वतंत्र पण सावध पावले!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांची नुरा कुस्ती सुरू असताना महाविकास आघाडीतले दोन्ही घटक पक्ष शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस पुढची वाटचाल स्वतंत्रपणे करण्याच्या दृष्टीने स्वतंत्र सावध पावले टाकत आहेत.Thackeray was independent from the Mahavikas Aghadi but cautiously

उद्धव ठाकरे गेल्या दोन दिवसांपासून मातोश्रीवर लोकसभा जागांच्या जिल्हानिहाय आढावा बैठका घेत आहेत. या बैठकांमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव एकदाही घेतले नाही, पण काँग्रेस हा प्रामाणिक राजकीय मित्र असल्याचे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ज्या पद्धतीने भाजपशी आतून संधान बांधून वरवर आक्रमक बोलत आहेत, यातली “डबल गेम” लक्षात घेऊन उद्धव ठाकरे सावध राजकीय पावले टाकत आहेत. काँग्रेसची देखील त्यांना तशीच साथ मिळण्याची शक्यता आहे.



या आढावा बैठकीचे सत्र आणखी दोन दिवस चालणार आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईमधील आपल्या मजबूत लोकसभा मतदारसंघांची माहिती उद्धव ठाकरे समीक्षा बैठकीत घेतील.

अर्थात महाविकास आघाडी पूर्णपणे मोडीत निघाल्याची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष घोषणा अद्याप झाली नाही तरी देखील आघाडीच्या बैठकीत ठाकरे आपल्या मजबूत मतदारसंघांवर दावा ठोकणार आहेत. त्यांनी सर्व ४८ लोकसभा मतदारसंघांची माहिती संकलित करणे सुरू केले आहे. ज्या खासदारांनी गद्दारी केली आहे, त्यांच्या मतदारसंघात त्यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेसच्या मदतीने रणनीती तयार करत आहेत. जास्तीत जास्त कार्यक्रम रावण्याचे आदेश आजी-माजी पदाधिकाऱ्यांना दिले.

उद्धव ठाकरे यांची हिंगोलीमध्ये २७ ऑगस्टला जाहीर सभा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत्या २७ ऑगस्ट रोजी मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली शहर येथे रामलीला मैदानावर त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. दुपारी 3.00 वाजता सभा होणार असून उद्धव ठाकरे त्या सभेला संबोधित करणार आहेत, अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळवण्यात आली आहे. या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Thackeray was independent from the Mahavikas Aghadi but cautiously

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात विठ्ठल रखुमाईला शोभुनी दिसतो तिरंगा!