मोदींची कसली ठाकरेंना ऑफर??, ठाकरेंनी तर त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला; एकनाथ शिंदेंचे शरसंधान!!

Thackeray stabbed Modi in the back

विशेष प्रतिनिधी

पिंपरी : काँग्रेसमध्ये जाऊन मरण्यापेक्षा शरद पवारांनी अजित पवारांसोबत यावे आणि उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंसोबत यावे, अशी ऑफरची गुगली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नंदुरबारमधील सभेतून टाकली होती. पण त्या गुगली वर क्लीन बोल्ड होत शरद पवारांनी मोदींची कथित ऑफर फेटाळून लावली. मोदींच्या कथित ऑफरवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाष्य केले. Thackeray stabbed Modi in the back

आहो कसली मोदींची ऑफर??, ठाकरेंनी तर त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यामुळे मोदी आणि भाजप ठाकरेंना आपल्याबरोबर कधी घेणार नाहीत, असे उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिले. मावळचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदेंनी रोड शो केला. पिंपरी-चिंचवड शहरातील रोड शोमध्ये मुख्यमंत्री तास सहभागी झाले होते. त्यात खासदार बारणे, आमदार अण्णा बनसोडे, अश्विनी जगताप, उमा खापरे, महेंद्र थोरवे यांचा सहभाग होता. यावेळी त्यांना पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरे, शरद पवार यांना दिलेल्या ऑफरबद्दल विचारले तेव्हा शिंदेंनी वरील उत्तर दिले.

लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना एकही जागा मिळणार नाही, असा दावा शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी केला. ‘महाविकास आघाडी राज्यात लोकसभेच्या किमान ३५ जागा जिंकत आहे. पंतप्रधान मोदी राज्यात ठाण मांडून बसलेत. पण त्यानं काही होणार नाही. शिंदेंनी पक्ष चोरला. धनुष्यबाण चोरला. त्यांच्याकडे स्वत:चं असं आहेच काय? त्यांना लोक मतं देणार नाहीत. डॅमेज कंट्रोल करण्यासाठी त्यांच्याकडे आता उरलंय काय?’, असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. पण एकनाथ शिंदे यांनी राऊतांच्या दाव्याची आणि सवालाची खिल्ली उडवली.

Thackeray stabbed Modi in the back

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात