ठाकरे – पवार सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात; देवेंद्र फडणवीस यांची संतप्त प्रतिक्रिया


प्रतिनिधी

मुंबई : केवळ आणि केवळ राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आल्याने समाजात अतिशय संतप्त भावना आहेत. न्यायालयात प्रकरण सुरू असताना केवळ राज्य सरकारच्या वेळकाढूपणामुळे मोठा फटका समाजाला बसला आहे. Thackeray Political reservation of OBCs terminated due to Pawar government’s refusal

आज भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक झाली आणि ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी 26 जून रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ओबीसींना हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे आणि त्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही. हे आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारला बाध्य करू आणि गरज पडली तर न्यायालयात जाऊ, अशी भूमिका या बैठकीत घेण्यात आली.

या बैठकीला पंकजाताई मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, खा. रक्षाताई खडसे, अतुलजी सावे, डॉ. संजय कुटे, मनिषाताई चौधरी, जयकुमार गोरे, योगेश टिळेकर, चित्राताई वाघ आणि इतरही सहकारी उपस्थित होते.”

Thackeray Political reservation of OBCs terminated due to Pawar government’s refusal

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात