छत्रपती संभाजीराजे यांनी मोदी सरकार कडून मिळालेल्या राष्ट्रपती नियुक्तीची राज्यसभेची 6 वर्षांची पहिली टर्म संपताच दुसऱ्या टर्मसाठी “अपक्ष” म्हणून राजकीय हुंकार भरला खरा, पण आता त्यांची केवळ “अपक्ष” उमेदवारी राखण्यासाठी कोंडी होताना दिसते आहे. Thackeray – Pawar’s words to each other; Sambhaji Raje’s candidature Independent
अर्थात याला केवळ संभाजीराजे यांची स्वतःची भूमिका कारणीभूत ठरत नसून ठाकरे – पवारांनी एकमेकांना दिलेले “शब्द” राजकीयदृष्ट्या कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येते आहे.
– पवारांनी फिरवला शब्द
वास्तविक पाहता शरद पवारांनी संभाजीराजे यांना राष्ट्रवादीची जादा मत देण्याचे आधी जाहीर केले होते. परंतु त्यांनी नंतर शिवसेना ठरवेल त्या उमेदवाराला राष्ट्रवादीची जादा मते जातील, असे जाहीर करून संभाजीराजेंची प्रथम कोंडी केली. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे यांच्याशी थेट चर्चा करून यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली. त्यांच्याकडे शिष्टाईसाठी आपले सचिव मिलिंद नार्वेकर, मंत्री उदय सामंत यांना देखील पाठवले. संभाजीराजे यांनी शिवसेनेत येऊन आपली उमेदवारी घ्यावी, अशी ही ऑफर होती आणि अजूनही आहे.
– राजेंचा होरा चुकला??
परंतु संभाजीराजे आपल्या “अपक्ष” उमेदवारीवर ठाम आहेत. तशीच शिवसेना देखील आपल्या पक्षाची उमेदवारी संभाजीराजे यांनी घ्यावी यासाठी ठाम राहिल्याने संभाजीराजे यांची राजकीय कोंडी झालेली दिसते. भाजपची जादा 22 मते आणि अपक्ष आमदारांची मते या आधारे आपण राज्यसभेवर सहज निवडून जाऊ, असा संभाजीराजे यांचा सुरुवातीचा होरा होता. परंतु, संभाजीराजे यांचा मूलभूत राजकीय कल राष्ट्रवादीकडे असल्याचे कोणताच पक्ष विसरू शकलेला नाही. त्यामुळे संभाजीराजे यांना पाठिंबा देताना त्यांच्याकडून राजकीय कमिटमेंट घेणे सर्वच पक्षांना महत्त्वाचे वाटले म्हणूनच शिवसेनेने देखील खुद्द संभाजी राजे यांना उद्या दुपारी 12.00 वाजेपर्यंतची शिवबंधन बांधण्याची वेळ दिली आहे. अन्यथा शिवसेनेचा बी प्लॅन देखील तयार आहे. चंद्रकांत खैरे किंवा शिवाजीराव आढळराव पाटील या दोन पैकी एका माजी खासदार आला राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी उतरवण्याचा शिवसेनेचा हा प्लॅन आहे.
– एकमेकांना “शब्द” म्हणजे नेमके काय??
पण यातला खरा ट्विस्ट हा ठाकरे – पवारांनी एकमेकांना दिलेला “शब्द” आहे. 2 वर्षांपूर्वी राज्यसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे फक्त शरद पवारच निवडून येणे शक्य असताना पवारांच्या शब्दाखातर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फौजिया खान यांची उमेदवारी स्वीकारली. त्यांना शिवसेनेची जादा मते मिळवून दिली. आता शब्द पाळण्याची वेळ राष्ट्रवादीची आहे. त्यामुळे शिवसेनेने आग्रह धरलेल्या उमेदवाराला राष्ट्रवादीची जादा देणे हे ठाकरे – पवारांच्या शब्द देवाण – घेवाणीतला महत्त्वाचा भाग आहे. म्हणूनच पवारांनी राष्ट्रवादीची जादा मते शिवसेना देईल त्या उमेदवाराला देण्याची घोषणा करून टाकली आहे.
– पुरस्कृत उमेदवारीतून पेच मिटणे शक्य
संभाजीराजे यांनी शिवसेना पुरस्कृत उमेदवार घेतली तर हा पेच मिटण्या सारखा आहे. राष्ट्रवादीची जादा मध्ये मिळतील आणि संभाजीराजे यांना शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून राज्यसभेत प्रवेश करता येईल.
– स्वराज्य संघटनेचे भवितव्य काय??
पण यामध्ये “स्वराज्य” संघटनेमार्फत महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतंत्र राजकीय अस्तित्व निर्माण करण्याच्या संभाजीराजे यांच्या महत्त्वाकांक्षेला मात्र लगाम बसेल. मात्र, तो राजकीयदृष्ट्या संभाजीराजे यांना परवडेल का?? ज्या मराठा संघटना आज त्यांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या आहेत, त्या तशाच भविष्यकाळात उभ्या राहतील का??, हा देखील कळीचा प्रश्न ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App