ठाकरे + पवारांनी कार्यकर्त्यांच्या निवडणुकीला सोडले वाऱ्यावर; आले सात आणि आठ वर; महाराष्ट्रातल्या गावांनी ठाकरे आणि पवार ब्रँडची लावली वाट!!

Thackeray - Pawar

नाशिक : महाराष्ट्रातल्या नगरपरिषदा, नगरपंचायती नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजप महायुतीचा डंका वाजला, यात काही विशेष घडले नाही, तसा डंका तो वाजणारच होता. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पायाला भिंगरी लावून कार्यकर्त्यांच्या निवडणुकीतला प्रचार केला होता.Thackeray – Pawar brands crashed in Nagar Parishad elections

नगरपरिषदा, नगरपालिका, जिल्हा परिषदा, महापालिका यांच्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात. त्यामुळे त्या स्वतंत्रपणे लढवाव्या लागतात, अशी मखलाशी सगळ्यात पक्षांच्या नेत्यांनी केली होती. त्याचप्रमाणे ती ठाकरे – पवारांच्या नेत्यांनी सुद्धा केली होती, पण या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार मैदानात उतरून प्रचारासाठी फिरले होते. त्यांनी गावागावात जाऊन प्रचार केला होता.



 

– सुप्रिया सुळे प्रचारात फिरकल्याही नाहीत

त्या उलट ठाकरे पवारांच्या नेत्यांनी विशेषत: सुप्रिया सुळे आदित्य ठाकरे स्वतः उद्धव ठाकरे आणि शरद पवार त्याचबरोबर युगेंद्र पवार यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले होते. ज्या कार्यकर्त्यांच्या बळावर सुप्रिया सुळे यांनी बारामतीतून निवडणूक लढवून जिंकली होती, त्या कार्यकर्त्यांच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे बारामतीत फिरकल्या सुद्धा नव्हत्या. त्या सगळी निवडणूक युगेंद्र पवारांच्या गळ्यात टाकून मोकळ्या झाल्या होत्या. युगेंद्र पवार सुद्धा एखाद दोन दिवस कार्यकर्त्यांबरोबर फिरले. त्यानंतर स्वतःच्या लग्नासाठी ते बारामतीतून निघून गेले होते. रोहित पवार फक्त जामखेड मध्ये अडकले होते.

दुसरीकडे शरद पवारांनी या वयामध्ये प्रचार करणे अपेक्षितच नव्हते. त्यामुळे त्यांनी बारामती सह इतर कुठल्याही गावांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांसाठी प्रचार केला नाही.

उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी फक्त ठाकरे बंधूंच्या युतीवर कॉन्सन्ट्रेशन केले, ते मुंबई पुरते आणि फार तर बाकीच्या महापालिकांपुरते. त्यांनी गावागावांमधल्या कार्यकर्त्यांना आणि आपल्या सैनिकांना वाऱ्यावर सोडून दिले होते. तुमची निवडणूक तुम्ही लढा, फार तर आमचे चिन्ह घ्या, एवढीच भूमिका त्यांनी प्रत्यक्षात वठवली होती.

– फक्त सात-आठ जागी यश

या सगळ्याचे परिणाम नगरपरिषदा नगरपंचायती नगरपालिकांच्या निवडणुकीत दिसले. ठाकरे – पवारांचे पक्ष सात आणि आठ वर येऊन पोहोचले. ठाकरे – पवारांच्या नेत्यांनी Vote Chori वगैरे मुद्द्यांवर मुंबईत बसून मोठी आगपाखड केली. उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, संजय राऊत, आदित्य ठाकरे यांनी मोठ्या पत्रकार परिषदा घेतल्या, पण हे नेते कार्यकर्त्यांच्यासाठी मैदानात उतरून प्रचाराला गेले नाहीत. महाराष्ट्रातले महत्त्वाचे मुद्दे त्यांनी जनतेसमोर जाऊन मांडले नाहीत. वास्तविक फडणवीस शिंदे आणि अजितदादा या पद्धतीने प्रचारासाठी केले, तशा पद्धतीने प्रचार करायला किंवा महाराष्ट्रात फिरायला ठाकरे पवारांच्या नेत्यांना कोणी अडवले नव्हते, कुणी आडकाठी केली नव्हती. पण हे नेते महाराष्ट्रात फिरलेच नाहीत. त्याच्याच परिणाम गावागावातल्या निवडणुकांमध्ये दिसला.

– ठाकरे – पवार ब्रँडची लावली वाट

सगळा महाराष्ट्र हाताच्या रेषांप्रमाणे ओळखतो असे म्हणणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त सात नगराध्यक्ष पदांवर यश मिळू शकले. उद्धव ठाकरेंची शिवसेना आठ नगराध्यक्ष पदांवर येऊन थांबली. ठाकरे आणि पवार या दोन ब्रँडची महाराष्ट्रातल्या जनतेने पुरती वाट लावली. पण त्याला कारणीभूत भाजप आणि महायुती ठरण्यापेक्षा स्वतः ठाकरे आणि पवारच आणि त्यांचे नेतेच ठरले.

Thackeray – Pawar brands crashed in Nagar Parishad elections

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात