ठाकरे सरकारचा कोविड घोटाळा १० दिवसांत बाहेर काढणार, आर्थिक कमाईसाठी लोकांना घाबरवले जातेय, किरीट सोमय्या यांचा इशारा


विशेष प्रतिनिधी

मुंबई : आर्थिक कमाईसाठी कोरोनावरून सत्ताधाऱ्यांकडून पुन्हा घाबरवण्याचं काम सुरु आहे. मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा वाढला असला तरी कोविड सेंटर्स रिकामे आहेत. 98 टक्के रुग्ण आपल्या घरी किंवा नर्सिंग होममध्ये बरे होत आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारचा कोविड घोटाळा बाहेर काढणार असल्याचा इशारा भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी दिला आहे.Thackeray govt scam to be exposed in 10 days, people are scared for financial gain, warns Kirit Somaiya

सोमय्या म्हणाले, मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा वाढला असला तरी कोविड सेंटर्स रिकामे आहेत. बीकेसीमध्ये 2 हजार 400 बेडपैकी 800 बेडवर रुग्ण आहेत. दहीसरमध्ये 750 बेड आहेत पण अजून एकही रुग्ण तिथे दाखल नाही.नेस्को सेंटरमध्ये 2 हजार बेड्सपैकी 900 बेड भरले आहेत. याचा अर्थ 98 टक्के रुग्ण आपल्या घरी किंवा नर्सिंग होममध्ये बरे होतात. तसंच ज्यांचे लसीकरण झाले आहे त्यातील 99.99 टक्के लोक सुरक्षित आहेत. .किरीट सोमय्या यांच्या आरोपांना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी उत्तर दिले आहे.

त्या म्हणाल्या, लोकांनी घाबरून जावे अशी वक्तव्ये आम्ही पहिल्यापासूनच केलेली नाहीत. कोरोना वाढत असला तरी लोकंनी घाबरुन जावू नये. घाबरण्यापेक्षा कोरोना नियमांचे पालन करत काळजी घेतली पाहिजे. कोरोनाचं संकट गंभीर आहे. परंतु, आम्ही संकटांना घाबरत नाही. खुर्चीत बसून टीका करणं सोपं असतं. प्रत्यक्ष काम करून दाखवाह्व.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेतही घोटाळ्याचा आरोप केला होता. कोविडमध्ये देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु आहे. महाराष्ट्राने अधिक चांगल्या प्रकारे हाताळणी केली असती तर राज्यातील 9 लाख 55 हजार रुग्ण कमी असते.

कोरोनामुळे करोनामुळे मरण पावलेल्या 30 हजार 900 करोना रुग्णांना महाराष्ट्र वाचवू शकला असता असं अहवाल सांगतो. मग आता यासाठी जबाबदार कोणाला धरायचं? असा प्रश्न फडणवीस यांनी ठाकरे सरकारला विचारला होता.

Thackeray govt scam to be exposed in 10 days, people are scared for financial gain, warns Kirit Somaiya

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात