अभिनेत्री हेमामालिनीबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पालकमंत्री गुलाबराव पाटीलांवर सगळीकडून टीका होऊ लागल्याने अखेर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.Thackeray government’s gimmick will not work? – Chitra Wagh
विशेष प्रतिनिधी
मुंबई : अभिनेत्री हेमामालिनीबद्दल केलेल्या वादग्रस्त केले होते. दरम्यान सगळीकडून टीका होऊ लागल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली होती.यावर चित्रा वाघ यांनी सरकारवर आणि गुलाबराव पटलांवर जोरदार हल्ला केला आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या की , गुलाबराव पाटलांनी माफी मागितली आणि लगेच मुख्यमंत्र्यांनी माफही केलं ? ही नौटंकी चालणार नाही. बेलगाम पाटलांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करून कारवाई करणार की नाही हे आधी सरकारनं सांगावं.महिलांचा अपमान करणारे पाटलांसारखे मंत्री हे कलंक आहेत. आता त्यांना वाचवणारेही कलंकित झालेत.
बोदवडला एका जाहीर सभेला संबोधताना मंत्री पाटील यांनी धरणगावातील रस्त्यांचा दाखला देताना ‘जर धरणगावात हेमामालिनीच्या गालासारखे रोड नसले तर राजीनामा देईन’ असे व्यक्तव्य केले होते.अभिनेत्री हेमामालिनीबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पालकमंत्री गुलाबराव पाटीलांवर सगळीकडून टीका होऊ लागल्याने अखेर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले की , ” माझ्या बोलण्याचा उद्देश वाईट नव्हता, आम्ही छत्रपती शिवरायांना मानणारा मावळा आहे.तरी माझ्या बोलण्यातून कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर आपण दिलगिरी व्यक्त करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App