ठाकरे खरे झुंजले, डबल ढोलकी पवार हरले, खोटे चाणक्य धुळीस मिळाले!!

Thackeray111

नाशिक : ठाकरे खरे झुंजले, डबल ढोलकी पवार हरले, खोटे चाणक्य धुळीस मिळाले!!, हेच राजकीय वास्तव चित्र महाराष्ट्रातल्या मतदारांनी महापालिका निवडणुकीत रंगविले.Thackeray fought for real, double drummer Pawar lost, fake Chanakya was destroyed!!

महापालिकांचे निकाल जे काही लागायचे ते लागले, पण त्यात ठाकरे खऱ्या अर्थाने झुंजले त्यांनी बलाढ्य भाजपपुढे सहजासहजी हार मानली नाही. त्यांनी मुंबईतले आपले बालेकिल्ले टिकवले, पण टाइमिंग साधून निवडणुकीची योग्य रणनीती आखण्यात ते कमी पडले. त्यांनी काँग्रेस बरोबर वेळीच जुळवून घेतले नाही म्हणून ते भाजप समोर थोडे कमी पडले. पण ठाकरेंनी एकदा भाजपशी पंगा घेतल्यानंतर भाजपच्या नेत्यांशी आतून किंवा बाहेरून कुठले संधान बांधले नाही. त्यांनी मुंबईची लढाई प्रामाणिकपणे लढली. पवारांसारखी डबल ढोलकी नाही वाजविली. त्यामुळे ठाकरे बंधूंना जे काही यश मिळायचे, ते व्यवस्थित मिळाले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळालेल्या 65 जागा आणि मनसेला मिळालेल्या 6 जागा म्हणजे एकूण 71 जागा हे साधे यश नाही. बलाढ्य भाजपशी खऱ्या अर्थाने झुंजल्याचे ते यश आहे.



त्यामुळे ठाकरे जरी मुंबई हरले, तरी ते मुंबईतून पूर्ण संपले असे अजिबात घडले नाही. उलट मुंबईत ते झुंजले आणि परभणी मध्ये त्यांनी काँग्रेस बरोबर सत्ता खेचून आणली. त्यामुळे ठाकरे बंधूंची झुंजार प्रतिमा महाराष्ट्रासमोर आली.

– पवारांची डबल ढोलकी फुटली

त्याच्याबरोबर उलट पवारांच्या बाबतीत घडले. पवारांनी डबल ढोलकी वाजवली. सत्तेतही आपण आणि विरोधातही आपणच असला नसता खेळ केला. अजित पवारांनी तर त्याच्यावर कडी केली ज्या भाजपच्या सत्तेच्या वळचणीला ते जाऊन बसले, त्याच भाजपवर त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले. सत्तेचा मलिदा खायचा आणि त्यात सत्तेला विरोध करायचे नाटक करायचे. 25 कोटी देणाऱ्या अदानींना बारामतीला बोलवायचे. त्यांच्या शेजारी खुर्चीवर बसायचे आणि भाजपशी दोन हात करतोय, असे दाखवायचे, असले नाटक पवार नावाच्या खोट्या चाणक्याला नडले. भाजपच्या दुसऱ्या फळीतल्या शिलेदारांनी अख्खे पवार कुटुंब पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये उचलून आपटले. एखाद्याला खाली आपटायचे असेल, तर आधी वर उचलावे लागते असे पवार स्वतःच म्हणाले होते. पवारांच्यात तर कुणाला वर उचलायची क्षमता उरली नाही, पण भाजपनेच त्यांना उचलून खाली आपटले. त्यासाठी अकेला देवेंद्रची सुद्धा गरज पडली नाही. चंद्रकांतदादा पाटील, मुरलीधर मोहोळ, महेश लांडगे यांच्यासारख्या भाजपच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतल्या नेत्यांनीच पवार कुटुंबाला आस्मान दाखविले.

 

– भाजप आणि पवार यांच्यात फाटले

या निवडणुकीच्या निकालानंतर भाजप आणि पवार यांच्यात फाटल्याचे चिन्ह दिसले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये विजय उत्सवात केलेल्या भाषणात एकनाथ शिंदे यांचे नाव घेतले, पण अजित पवारांचे नाव घेतले नाही. अजित पवारांनी सोशल मीडिया पोस्ट मध्ये महायुतीचा उल्लेख केला नाही. त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची नावे नमूद केली नाहीत.

 

अजित पवारांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये ज्या पद्धतीने भाजपला छळले, त्याचे पडसाद मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटतीलच, हे चिन्ह देवेंद्र फडणवीस चंद्रकांतदादा पाटील यांनी आधीच दाखवून दिले.

Thackeray fought for real, double drummer Pawar lost, fake Chanakya was destroyed!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात