नाशिक : आगे हुसेन, पीछे हसन; बीच मे जगा मिली तो मै भी घुसन!!, अशा स्टाईलने ठाकरे बंधूंच्या ऐक्य मेळाव्यात शरद पवारांनी सुप्रिया सुळे यांची एन्ट्री घडवून आणली. वास्तविक ठाकरे बंधूंचे ऐक्य हा शिवसेनेचा आणि मनसेचा कौटुंबिक विषय त्यासाठी दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी आणि सैनिकांनी जीवाचे रान केले. सगळा फोकस ठाकरे बंधूंवर राहील आणि त्यांच्या ऐक्याचा राजकीय की लाभ घेता येईल, असा होरा दोन्ही बाजूंच्या सैनिकांनी बांधला ठाकरे बंधूंनी देखील या सैनिकांना चांगला प्रतिसाद दिला. मराठीचा मुद्दा उचलून धरून सुरुवातीला सरकारवर दबाव आणला आणि त्याचे नंतर विजयी मेळाव्यात रूपांतर केले.
या सगळ्या कालावधीत माध्यमांमध्ये प्रतिक्रिया देण्याव्यतिरिक्त शरद पवार कुठेही नव्हते. पवारांनी माध्यमांमध्ये दिलेल्या प्रतिक्रिया देखील दोन डगरींवर हात ठेवणाऱ्याच होत्या. हिंदीची सक्ती नको पण हिंदी शिकायला हवी वगैरे बाता त्यांनी मारल्या. पण त्या पलीकडे जाऊन ठाकरे बंधूंचे ऐक्य झाले, तशी महाराष्ट्रात वातावरण निर्मिती यशस्वी झाली, तर त्याचा फटका भाजप पेक्षा आपल्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बसेल याची जाणीव पवारांसारख्या अनुभवी नेत्याला झाली. त्यामुळे त्यांनी सुरुवातीपासून स्वतःला त्या मेळाव्यापासून दूर ठेवले, पण आपला पक्ष आणि आपले प्रतिनिधित्व सगळेच बाजूला पडेल. आपल्या मूळच्या फाटाफुटीच्या राजकारणाचे सगळेच मुसळ केला जाईल, या धास्तीने पवारांनी सुप्रिया सुळेंना मेळाव्यात पाठवून दिले. त्यामुळेच “आगे हुसेन, पीछे हसन बीच मे जगा मिली तर मैं भी घुसन”, अशा स्टाईलने सुप्रिया सुळे यांची ठाकरे बंधूंच्या ऐक्यात एन्ट्री झाली.
पण जिथे पवार, तिथे ऐक्य नव्हे, तर फुट हा महाराष्ट्रातला किमान 40 वर्षांचा इतिहास आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष पवार जरी त्या मेळाव्यात सहभागी झाले नसले तरी त्यांच्या प्रतिनिधी सुप्रिया सुळे ऐक्य मेळाव्यात आल्याने ठाकरे बंधूंच्या ऐक्याच्या राजकीय भवितव्यावर ठळक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App