Thackeray : साडेतीन महिन्यांत 10 भेटी, ‘युती’च्या चर्चांना उधाण! दोन्ही ठाकरे पुन्हा एकत्र

Thackeray

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Thackeray  ‘हिंदी सक्ती’ आणि ‘त्रिभाषा सूत्र’ हे दोन्ही शासन निर्णय रद्द झाल्यानंतर झालेल्या विजयी मेळाव्यात तब्बल 20 वर्षांनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर दिसले होते. या ऐतिहासिक क्षणानंतर दोन्ही ठाकरे बंधूंच्या भेटीगाठींना अक्षरशः वेग आला आहे.Thackeray

मागील साडेतीन महिन्यांत दोघांची तब्बल 10 वेळा भेट झाली असून, आज (22 ऑक्टोबर) उद्धव ठाकरे चौथ्यांदा राज ठाकरे यांच्या निवासस्थानी ‘शिवतीर्थ’वर गेले आहेत.Thackeray

पहिली भेट 27 ऑगस्ट रोजी झाली होती, जेव्हा राज ठाकरे यांच्या घरी विराजमान झालेल्या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थवर पोहोचले होते. त्यानंतर दोन्ही कुटुंबांनी एकत्र स्नेहभोजन घेतले.Thackeray



यानंतर 10 सप्टेंबर रोजी उद्धव ठाकरे यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक शिवतीर्थवर भेट दिली. ही भेट राज ठाकरे यांच्या आई मधुवंती ठाकरे यांना भेटण्यासाठी असल्याचे समोर आले.

तिसरी भेट 17 ऑक्टोबर रोजी झाली, जेव्हा दादरच्या शिवाजी पार्कवर मनसेकडून आयोजित दीपोत्सव सोहळ्याचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर उद्धव ठाकरे पुन्हा एकदा शिवतीर्थवर गेले होते.

आणि आता, आज 22 ऑक्टोबर रोजी उद्धव ठाकरे यांनी मधुवंती ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवतीर्थला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. ही त्यांची चौथी कौटुंबिक भेट मानली जात आहे.

गेल्या काही आठवड्यांत दोन्ही ठाकरे बंधूंच्या वाढत्या भेटींमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि संभाव्य युतीच्या चर्चांना वेग आला आहे.

महाविकास आघाडी, मनसे आणि इतर पक्षांनी नुकतीच 14 आणि 15 ऑक्टोबर रोजी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम आणि निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेतली होती.

जरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी अधिकृतरीत्या युतीची घोषणा अद्याप केलेली नाही, तरी राजकीय वर्तुळात दोघे एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Thackeray Brothers together again

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात