नाशिक : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मतदान करून आल्यानंतर ठाकरे बंधूंनी एवढी आगपाखड केली, तर उद्या निकाल लागल्यानंतर ते काय करतील??, असा सवाल आज मतदानाच्या दिवशीच समोर आला.
एरवी कुठलाही नेता अथवा कुठलाही उमेदवार पराभव झाल्यानंतर सरकारी यंत्रणा किंवा इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वर खापर फोडायचा. पण ठाकरे बंधूंनी आज मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मतदान करून आल्यानंतरच सरकारी यंत्रणांवर मोठी आगपाखड केली. सध्या मतदानाचा एकूण ट्रेंड लक्षात घेता सरकारी यंत्रणा सत्ताधाऱ्यांसाठीच काम करत असल्याची टीका राज ठाकरे यांनी मतदान केंद्राच्या समोरच केली.
– उद्धव ठाकरेंनी दाखविल्या चुका
उद्धव ठाकरे यांनी मतदान करून आल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत मतदार याद्या मधल्या भरपूर चुका दाखविल्या. बोटाची शाई पुसली जाती आहे. ती पुसून पुन्हा मतदान होणार आहे. सध्याचे सत्ताधारी फक्त बोटावरची शाई पुसत नाहीत, तर पूर्ण लोकशाहीच पुसून टाकत आहेत, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. बाईचं नाव रवींद्र असेल का??, पण मतदार यादीत बाईचं नाव रवींद्र आहे. मतदान केंद्रांवरच तिथे भाजपच्या पाट्या लावल्यात. निवडणूक आयुक्त कसला पगार खाताहेत??, असे शरसंधान उद्धव ठाकरे यांनी साधले.
– मार्कर पेन वर राज ठाकरेंचा आक्षेप
मतदान केंद्रांवर मार्करच्या पेनद्वारे शाई लावली जाते आहे. त्यामुळे मतदार ती शाई पुसून पुन्हा मतदान केंद्रांवर येऊन मतदान करतील, असा आरोप राज ठाकरे यांनी मतदान करून आल्यानंतर केला. राज ठाकरे यांच्या आरोपाला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. माझ्या बोटावर पण मार्कर पेनद्वारेच शाई लावली. तुम्ही ती पुसून दाखवा असे आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांना दिले.
– फडणवीसांचा टोमणा
पण आत्तापर्यंत कुठलाही पराभूत उमेदवार किंवा पराभूत नेता प्रत्यक्षात निकाल लागल्यानंतर सरकारी यंत्रणाच्या विरोधात आरडाओरडा करताना दिसला होता आज मात्र ठाकरे बंधूंनी प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीच मतदान करून आल्यानंतर सकाळी सकाळीच सरकारी यंत्रणांना धारेवर धरले यातून त्यांनी पराभवाची नवी कारणे शोधली असा टोमणा देवेंद्र फडणवीस यांनी हाणला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App