विशेष प्रतिनिधी
मुंबई : Thackeray Brothers सुमारे ७४ हजार कोटींचा अर्थसंकल्प आणि देशातील सर्वात श्रीमंत असलेल्या मुंबई मनपासह ठाणे, पुणे, नाशिक, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, मीरा भाईंदर आदी मनपात ठाकरे बंधू युती करणार हे फिक्स झाले आहे. त्यांच्यासोबत शरद पवार गटही असेल.Thackeray Brothers
ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत बोलणी करण्यासाठी १६ डिसेंबर रोजी पहिल्यांदाच उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत १९ वर्षानंतर राज ठाकरेंच्या घरी पोहोचले. त्यांच्यासोबत आमदार अनिल परबही होते. आठवडाभरात युती, जागा वाटपाची घोषणा होईल, असे त्यांनी सांगितले. मुंबईत उद्धवसेनेने १२५, मनसे ८० ते ८५, तर शरद पवार गट २० ते २५ जागांचा फॉर्म्युला तयार झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, मविआत मनसेच्या प्रवेशाला कडाडून विरोध करत काँग्रेसने स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मंगळवारी तसेच संकेत दिले. त्यामुळे मुंबईसह नाशिक, पुणे, ठाणे, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, मीरा भाईंदर मनपात फिस्कटण्याची चिन्हे आहेत. इतर मनपात काँग्रेस मनसेला सोबत घेऊ शकते. दुसरीकडे भाजप, शिंदेसेनेत जागा वाटपाची पहिली फेरी झाली. त्यात त्यांनी १५० पेक्षा जास्त जागा निवडून आणण्यासाठी रणनिती आखत असल्याचे सांगितले. मुंबईत अजित पवारांचा पक्ष स्वतंत्र लढू शकतो.Thackeray Brothers
उद्धव ठाकरेंसाठी इकडे आड तिकडे विहीर, काँग्रेस स्वतंत्रचा फटका अधिक बसू शकतो
मुंबईत उद्धव ठाकरेंची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे. लोकसभेला काँग्रेसमुळे त्यांना दलित, मुस्लिमांची एकगठ्ठा मते मिळाली. विधानसभेतही काही प्रमाणात फायदा झाला. मुंबईत काँग्रेसचा किमान ४० वॉर्डात प्रभाव आहे. दुसरीकडे ६० मराठीबहुल वॉर्डात राज ठाकरे सोबत हवे, असेही त्यांना वाटते. म्हणून काँग्रेस आणि मनसेला एकत्र आणण्यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. पण बिहार विधानसभेनंतर काँग्रेसने मनसेला विरोध सुरू केला. म्हणून उद्धवांचे गणित बिघडण्यास सुरूवात झाली आहे. काँग्रेसच्या तुलनेत मनसेची शक्ती कमीच आहे. त्यामुळे काँग्रेस स्वतंत्र लढण्याचा अधिक फटका बसेल, हेही त्यांना ठावूक आहे. पण ५ जुलैपासून सुरू केलेल्या बंधुप्रेमाच्या प्रयोगावर ते पडदाही पाडू शकत नाहीत.
२० वर्षांनंतर बाळासाहेबांची हाक चिमण्यांनी ऐकली
उद्धवांच्या राजकारणाला कंटाळून २००५मध्ये राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले. तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी ‘या चिमण्यांनो परत फिरा रे’ अशी आर्त हाक दिली होती. ती २० वर्षानंतर चिमण्यांनी ऐकल्याचे दिसत आहे.
शरद पवार गट ठाकरेंसोबतच तरकाँग्रेस स्वतंत्रपणे लढण्यावर ठाम
२०१९ मध्ये शरद पवारांनी शिवसेना आणि काँग्रेसला मविआच्या छताखाली आणले होते. तो एक राजकीय चमत्कार मानला गेला. आताही उद्धव-राज युती पवारांच्या आदेशावरूनच झाली आहे. उद्धव यांना पवारांकडून पुन्हा चमत्काराची आशा आहे. सूत्रांनी सांगितले की, किमान मुंबईत मनसेला सोबत घेण्यासाठी पवार राहुल गांधी यांच्याशी वाटाघाटी करत आहेत.
युतीच्या पहिल्या बैठकीत ठोस निर्णय नाही
छत्रपती संभाजीनगर | मंगळवारी भाजप-शिंदेसेना युतीसाठी पहिली बैठक झाली. त्यात फक्त मागील निकालाचा आढावा घेण्यात आला. २९ प्रभागांत गणिते कशी बदलली आहेत. ११५ पैकी ६५ हिंदुबहुल वॉर्डातच युतीला संधी आहे. त्यात शिवसेना भाजपला कुठे परिस्थिती अनुकूल ठरू शकते याची चर्चा करण्यात आली. कोणताही ठोस निर्णय झाला नाही.
मनसे पहिल्यांदाच उद्धवसेनेसोबत लढणार
९ मार्च २००६ रोजी राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी २००७, २०१२ आणि २०१७ मध्ये मुंबई मनपाची निवडणूक स्वतंत्रपणे लढवली. त्यात २००७ मध्ये ७, २०१२ मध्ये २७ तर २०१७ मध्ये ७ नगरसेवक निवडून आले होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App