शिक्षक पात्रता परीक्षा (टीइटी) गैरव्यवहार प्रकरणात अपात्र विद्यार्थ्यांना पात्र करण्यासाठी त्यांची माहिती व पैसे एजंटांकडे देणारा संशयीत आरोपी कलीम गुलशेर खान (वय 52, रा. बुलडाणा) याच्या पोलिस कोठडीत 28 एप्रिलपर्यंत वाढ करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. TET exam scam accused agent kalim Khan police custody extended by court
विशेष प्रतिनिधी
पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा (टीइटी) गैरव्यवहार प्रकरणात अपात्र विद्यार्थ्यांना पात्र करण्यासाठी त्यांची माहिती व पैसे एजंटांकडे देणारा संशयीत आरोपी कलीम गुलशेर खान (वय 52, रा. बुलडाणा) याच्या पोलिस कोठडीत 28 एप्रिलपर्यंत वाढ करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
या प्रकरणात आरोपी कलीम खान याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. आरोपी कलीम खान याने टीईटी 2019-20 परीक्षेत अपात्र ठरलेल्या ऐंशी ते शंभर उमेदवारांकडून त्यांना पात्र करण्यासाठी एक कोटी रक्कम स्वीकारून ती एजंट संतोष व अंकुश हरकळ यांच्याकडे दिल्याचे तपासात निदर्शनास आले आहे.
याबाबत आरोपी उडवाउडवीची उत्तरे देत आहे. याशिवाय ‘टीईटी’ 2019-20 या परीक्षेच्या अंतिम निकालातील 1126 अपात्र उमेदवारांना पात्र करण्यासाठी त्यांचे गुण वाढविण्यात आल्याचे एजंट संतोष हरकळ याचा लॅपटॉप आणि जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा व्यवस्थापक डॉ. प्रितिश देशमुख याच्या कार्यालयातील हार्ड डिस्कच्या विश्लेषणात निष्पन्न झाले आहे. या संदर्भात तपास करण्यासाठी, अन्य एजंटांचा शोध घेण्यासाठी आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकील जाधव यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.
एजंट संतोष हरकळ याच्याकडून जप्त लॅपटॉपमध्ये 1270 उमेदवारांची नावे, आसन क्रमांक आदी नोंदी असलेली ‘एक्सेल शीट’ मिळाली असून, त्यापैकी 1126 अपात्र उमेदवारांचे गुण वाढविण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यापैकी कोणकोणत्या उमेदवारांशी संपर्क साधला, याबाबत आरोपी कलीम खान तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी न्यायालयात दिली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App