विशेष प्रतिनिधी
पुणे : शिक्षक पात्रता परीक्षेत गैरव्यवहार केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली असून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक केली आहे. सायबर पोलिसांनी ही अटकेची कारवाई केली असून पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी याप्रकऱणी काही धक्कादायक खुलासे केले आहेत. तुकाराम सुपे यांच्यासोबत आणखी एकाला अटक करण्यात आल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. TET EXAM: 4.2 crore paperfooty scam: 50 thousand to 01 lakh from each student! Shocking revelations of Pune Police Commissioner
“आम्ही दोन पेपरफुटीची प्रकरणं हाताळत होतो, यामध्ये प्राथमिकपणे आरोग्य भरतीचा तपास सुरु होता. यावेळी आम्हाला म्हाडाच्या परीक्षेची माहिती हाती लागली आणि परीक्षा होण्याच्या आदल्या रात्री सर्वांना अटक केली. याचा तपास सुरु असताना टीईटीच्या परीक्षेतही गडबड झाल्याचं समोर आलं. त्यानंतर आम्ही गुन्हा दाखल केला. टीईटीच्या परीक्षेत जो काही गैरप्रकार सुरु होता त्यानुसार दोघांना अटक करण्यात आली आहे. तुपे यांच्यासोबत आणखी एकाला अटक करण्यात आली आहे.”
“परीक्षा घेतल्यानंतर काही उमेदवारांना सीट क्रमांक लिहू नका सांगितलं जायचं. स्कॅनिंग करताना तो नंबर लिहिला जायचा. जर कोणी राहिलं असेल तर त्यांना पेपर पुन्हा तपासणीसाठी द्या सांगायचे आणि नंतर त्यात बदल केले जायचे,”अशी माहिती अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.
पोलिसांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, हा संपूर्ण घोटाळ्यात 4 कोटी 20 लाख रुपयांचा गैरव्यवहार करण्यात आला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याकडून हे लोक 50 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत पैसे घेत होते. यातील तुकाराम सुपेकडून तब्बल 88 लाख रुपये रोकड जप्त करण्यात आली. यासोबतच, तुकाराम सुपेकडूनच 5 तोळे दागिने आणि 5.5 लाखांची एफडी असलेली कागदपत्रे सुद्धा सापडली.
उल्लेखनीय बाब म्हणजे, जवळपास सव्वा चार कोटींच्या गैरव्यवहारात प्रत्येकाचा वाटा देखील ठरलेला होता. त्यानुसारच तुकाराम सुपेला तब्बल 1 कोटी 70 लाख रुपये मिळणार अशी डील झाली होती. तर यातील दुसरा एक आरोपी प्रितीश देशमुखला 1 कोटी 25 लाख रुपये आणि अभिषेक सावरीकरला सुद्धा 1.25 कोटी रुपये मिळतील अशी डील झाली होती. यापैकीच 80 लाखांचा रोकड सुपेकडून जप्त करण्यात आला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App