विशेष प्रतिनिधी
पुणे :राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरव्यवहारासह म्हाडा पेपर फुटी प्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी आणखी तीन दलालांना अटक केली आहे. TET and MHADA exams Shackles to the three brokers in the scam
संबंधित एजंटांनी उमेदवारांकडून कोट्यावधींची माया गोळा करून वाटून घेतल्याचे उघडकीस आले आहे. सायबर पथकांनी नाशिक, बुलढाणा, लातूर परिसरात छापे मारून दलालांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
त्यामुळे टीईटीसह म्हाडा पेपर फुटीप्रकरणातील आणखीन आर्थिंक गैरव्यवहार उघडकीस येणार आहे. मुकुंदा जगन्नाथ सुर्यवंशी (वय ३३, रा. नाशिक), कलीम खान (वय ५२ रा. बुलढाणा), जमाल इब्राहिम पठाण (वय ४० रा. लातूर) अशी अटक केलेल्या दलालांची नावे आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App