मटन खाऊन देवदर्शन; पण सुप्रिया सुळेंच्या कार्यालयाचे वेगळे स्पष्टीकरण!!

प्रतिनिधी

पुणे : मध्यंतरी शरद पवारांनी मटन खाल्ल्यामुळे मंदिरात जाऊन दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेणे टाळले होते. पण खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र मटन खाऊन देवदर्शन केल्याची फेसबुक पोस्ट माजी मंत्री आणि पुरंदरचे माजी आमदार विजय बापू शिवतारे यांनी केली होती. Temple visits after consuming non veg food, supriya sule’s office denied allegations

आता या विषयावर खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्यालयातून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. सुप्रिया सुळे या गेल्या काही वर्षांपासून पूर्ण शाकाहारी बनल्या आहेत. त्या आता मांसाहाराचे सेवन करीत नाहीत, असा खुलासा त्यांच्या कार्यालयाने केल्याचे टीव्ही 9 मराठीच्या बातमीत नमूद केले आहे. त्याचबरोबर त्या पुण्यातल्या एका रेस्टॉरंटच्या प्रमोशनसाठी गेल्या असल्याचे महाराष्ट्र टाइम्सच्या बातमीत नमूद केले आहे.



या संदर्भात खुद्द सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारल्यानंतर मटन खाऊन देव दर्शन घ्यावे किंवा नाही या विषयावर आपला फारसा अभ्यास नाही. तुम्ही मला महागाई, बेरोजगारी, पाणी प्रश्न या विषयांवर प्रश्न विचारू शकता. मी त्यावर बोलू शकेन, असे त्यांनी म्हटले आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी मटन खाऊन नंतर बारामती मतदार संघातल्या विविध देवदेवतांची दर्शने घेतली. या संदर्भात विजय बापू शिवतारे यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर व्हिडिओ आणि काही फोटो शेअर केले होते. त्यानंतर या विषयावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली. अनेकांनी सोशल मीडियावर सुप्रिया सुळे आणि विजय बापू शिवतारे यांच्यावर शरसंधान देखील साधले. त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या कार्यालयातून या विषयावर स्पष्टीकरण देण्यात आले, तर खुद्द सुप्रिया सुळे यांनी देखील त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली.

Temple visits after consuming non veg food, supriya sule’s office denied allegations

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात