विशेष प्रतिनिधी
मुंबई : Girish Mahajan शिक्षकांच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मोठे यश आले आहे. विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर विनाअनुदानित शिक्षकांच्या खात्यात २० टक्के वाढीव पगार जमा होईल, असे आश्वासन सरकारने दिले आहे. आझाद मैदानात शिक्षकांच्या आंदोलनात जाऊन मंत्री गिरीश महाजन ( Girish Mahajan ) यांनी ही घोषणा केली. शिक्षकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. चर्चा सकारात्मक झाल्याचे महाजन यांनी सांगितले. दरम्यान, बुधवारी सकाळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आंदोलनकर्त्यांशी भेट घेत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली होती.Girish Mahajan
गिरीश महाजन म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिक्षकांसबंधी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मात्र, थोड्या आर्थिक अडचणींमुळे मधल्या काही काळातील हफ्ते देण्यास उशीर झाला. इथून पुढे पगाराची तारीख टळणार नाही. पगार नियमितपणे तुमच्या खात्यात जमा होईल. १८ तारखेला पावसाळी अधिवेशन संपेल. त्यावेळी तुमच्या खात्यात २० टक्के वाढीव पगार जमा झालेला असेल. मुख्यमंत्री हे शिक्षकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहेत असेही महाजन म्हणाले. राज्यातील विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्यासंदर्भात निर्णय राज्य शासनाने ऑक्टोबर २०२४ मधील अधिवेशनात घेतला होता. मात्र अद्याप निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही.Girish Mahajan
शिक्षकांनी रस्त्यावर उतरणे दुर्दैवी
शरद पवार म्हणाले, शिक्षक हे पिढ्या घडवणारे असतात. त्यांच्या न्याय मागण्यांसाठी रस्त्यावर उतरावे लागणे हे दुर्दैव आहे. सरकारने २०२४ मध्ये अनुदानासंदर्भात निर्णय घेतला होता तरी आजही अंमलबजावणी नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे. याची दखल घ्यावी.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिक्षक आझाद मैदानात
आंदोलनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने आझाद मैदानात जमले आहेत. पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनीही आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. रोहित पवार यांनी तर मंगळवार रात्रीपासून आझाद मैदानात मुक्काम केला. पावसामुळे मैदानामध्ये मोठ्या प्रमाणात चिखल साचला असूनही आंदोलनकर्ते ठाम भूमिकेत होते.
तुमचा हा लढा जिंकेपर्यंत सोबत राहीन : उद्धव ठाकरे
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे आणि नेते सचिन अहिर यांनीही आंदोलनस्थळी भेट देत शिक्षकांना पाठिंबा दर्शवला. ठाकरे म्हणाले, ‘तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. मराठी माणसाला चिरडण्याचा विडा दिल्लीच्या गुलामांनी उचलला आहे. एकवटून लढा दिलात, हा लढा जिंकेपर्यंत तुमच्या सोबत राहीन,’ असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी दिला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App