नाशिक : हजार शब्दांपेक्षा एक फोटो किंवा चित्र पटकन बोलून जातो असे म्हटले जाते. असेच एक “राजकीय चित्र” आज सह्याद्री अतिथीगृहात दिसले…!!Tea before the legislature session
सह्याद्री अतिथीगृहा मध्ये महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशन पूर्वीचा पारंपरिक चहापानाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमावर नेहमीप्रमाणे विरोधकांनी बहिष्कार घातला होता. पण तो सांगून होता. मुख्यमंत्र्यांनी मात्र न बोलता चहापानाला दांडी मारली होती. त्यामुळे या चहापानाचे मुख्य आकर्षण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हेच राहिले.
राज्य विधी मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सहयाद्री अतिथीगृह येथे झालेल्या चहापान कार्यक्रमास उपस्थित होतो. pic.twitter.com/oHVGTtr4vT — Aaditya Thackeray (@AUThackeray) March 2, 2022
राज्य विधी मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सहयाद्री अतिथीगृह येथे झालेल्या चहापान कार्यक्रमास उपस्थित होतो. pic.twitter.com/oHVGTtr4vT
— Aaditya Thackeray (@AUThackeray) March 2, 2022
या चहापानाचे अनेक फोटो विविध मंत्र्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर टाकले आहेत. या फोटोंकडे बारकाईने पाहिले असता काँग्रेस – राष्ट्रवादीचे मंत्री प्रामुख्याने आदित्य ठाकरे यांच्या भोवती दिसतात. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, आणि शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे हे ठळक दिसतात. त्यांच्याबरोबर मनीषा कायंदे, पलिकडे शिवसेनेचे मंत्री अनिल परब हेही दिसतात. अन्य अनेक मंडळी दिसतात. पण प्रामुख्याने काँग्रेस – राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या मधोमध आदित्य ठाकरे हे दिसतात…!!
आता याचा नेमका “राजकीय अर्थ” काय काढायचा…?? मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत आदित्य ठाकरे यांच्या भोवती काँग्रेस – राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी गर्दी केली आहे…?? की काँग्रेस – राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या “चक्रव्यूहात” आदित्य ठाकरे अडकले आहेत…?? यातून नेमका अर्थ काय निघतो…??
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात चहापानाचा कार्यक्रम पार पडला. pic.twitter.com/ZGGoYLoleC — Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) March 2, 2022
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात चहापानाचा कार्यक्रम पार पडला. pic.twitter.com/ZGGoYLoleC
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) March 2, 2022
सध्याच्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची “राजकीय अवस्था” हे फोटो सांगून जातात का…?? मुख्यमंत्री फक्त चहापानालाच नव्हे, तर अनेक ठिकाणी अनुपस्थित असतात. आदित्य ठाकरे हेच शिवसेनेचा चेहरा मंत्री म्हणूनही दिसतात. एकनाथ शिंदे हे “सायडिंगला” गेलेले दिसतात. अनिल परब मंत्रिमंडळात आहेत, पण आता केंद्रबिंदू वर नाहीत. हे यातून दिसते…!! याचा अर्थ शिवसेनेकडून आदित्य ठाकरे हेच मुख्यमंत्र्यांना पर्याय म्हणून “अघोषित प्रमुख” आहेत का…?? आणि प्रत्यक्ष मंत्रिमंडळ किंवा मंत्र्यांचा कारभार प्रामुख्याने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बाळासाहेब थोरात हे राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या वतीने पाहत आहेत का…?? नेमका अर्थ काय काढायचा या फोटोंमधून…??
शिवसेनेने आदित्य ठाकरे हेच आता महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या केंद्रबिंदू वर मुख्य आहेत हे मानून चालायचे…?? की प्रत्यक्षात ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या “चक्रव्यूहात” अडकले आहेत, ही वस्तुस्थिती गृहीत धरून चालायचे…?? शिवसेनेपुढे खऱ्या अर्थाने मोठे प्रश्नचिन्ह आहे…!! आगामी काळात या प्रश्नाचे उत्तर मिळण्याची अपेक्षा आहे.
उद्यापासून सुरू होणाऱ्या ' अर्थसंकल्पीय #अधिवेशन२०२२ ' च्या पूर्वसंध्येला राज्य सरकारच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चहापानास उपस्थित राहून जमलेल्या विधानसभा तसेच विधानपरिषदेच्या सहकारी सदस्यांसोबत संवाद साधला.#BudgetSession2022 #Maharashtra pic.twitter.com/j3WvkYNKpb — Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) March 2, 2022
उद्यापासून सुरू होणाऱ्या ' अर्थसंकल्पीय #अधिवेशन२०२२ ' च्या पूर्वसंध्येला राज्य सरकारच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चहापानास उपस्थित राहून जमलेल्या विधानसभा तसेच विधानपरिषदेच्या सहकारी सदस्यांसोबत संवाद साधला.#BudgetSession2022 #Maharashtra pic.twitter.com/j3WvkYNKpb
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) March 2, 2022
… आणि काँग्रेस – राष्ट्रवादीचे मंत्री जरी आज आदित्य ठाकरे यांच्या भोवती जमले असतील, तरी ते पुढचे किती दिवस आदित्य ठाकरे यांना केंद्रबिंदू वर ठेवतील…?? की त्या केंद्रबिंदूचे नंतर “चक्रव्युहात” रूपांतर करून ते आदित्य ठाकरे यांना राजकीयदृष्ट्या घेरून टाकतील…!! हेही आगामी काळात समजेल, अशी अपेक्षा आहे…!!
राष्ट्रवादीच्या तीन मंत्र्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा आहे. त्यापैकी अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे दोन मंत्री “आत” आहेत. एक मंत्री प्राजक्त तनपुरे हे “बाहेर” आहेत. पण ते नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे पुढचा नंबर नेमका कुणाचा असेल…?? त्यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे मंत्री काय भूमिका घेतील…??, अशीही शंका राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App