देशभरातून आलेले भाविक या माहूरच्या देवीचा प्रसाद म्हणून येथील विडा तांबूल आवर्जून घेत असतात
विशेष प्रतिनिधी
नांदेड : महाराष्ट्रातील प्रसिद्ध साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असणाऱ्या माहूर येथील रेणुकामाता मंदिराशी संबंधित एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. या ठिकाणी विडा तांबुलाचे अतिशय महत्त्व असल्याचे सर्वांनाच ठाऊक आहे. देशभरातून आलेले भाविक या माहूरच्या देवीचा प्रसाद म्हणून येथील विडा तांबूल आवर्जून घेत असतात आणि मोठ्याप्रमाणावर आपल्यासोबतही नेत असतात. त्यामुळे रेणुकामातेचा तांबुलाचा नैवद्य प्रसाद सर्वत्र प्रसिद्ध आहे. या तांबुलला आता जीआय टॅग (GI Tag) मिळाला असून ती माहूरची ओळख निर्माण करणार आहे. Tambul of Renukadevi temple in Mahur got GI tag
श्री रेणुका मातेचा विडा तांबुल हा मुख्यप्रसाद असून, पुरणपोळी नैवेद्यानंतर तांबुल विडा देवीला दिला जातो. विडा तांबुल नैवेद्य देवीला अर्पण करण्याची परंपरा आहे. आई रेणुका मातेने श्री विष्णुकवी महाराज यांच्या स्वप्नात येऊन तांबुलाचा प्रसाद करून देण्यास सांगितले होता, तेव्हापासून ही प्रथा चालु आहे, असे सांगितले जाते. या ठिकाणी सकाळी सहा ते रात्री साडे आठपर्यंत तांबुलाचा प्रसाद तयार करणे सुरू असते. दिवसाला हजारों रुपयांच्या तांबुलाची विक्री होते. या तांबुलामध्ये नागवेलीची पाने, सोप, सुपारी, लवंग, कात, चुना, विलायची, ओवा, धनीयादाळ, आस्मान तारा, ज्येष्ठ मध, चमनबार,जायफळ, जायपत्री यांचा समावेश असतो.
रक्तशुद्धीकरणासाठी नागवेलीपान आणि काथ हे खूपच उपयुक्त आहे. खोकल्याकरता लवंग, जेष्ठमध पचनक्रिया चांगली होण्यासाठी, बडीशेप सदैव ऊर्जित आणि सचेत ठेवण्याकरता, केशर आणि जायफळ हे वेदनाशामक कार्य करत असल्याचे आयुर्वेदामध्ये आढळते.
जीआय टॅग म्हणजे काय?
वर्ल्ड इंटलॅक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनाइजेशननुसार, जीआय टॅग एकप्रकारचा लेबल आहे. जो कोणत्याही उत्पादनाच्या भौगोलिक ओळखीच्या रुपात दिला जातो. हा टॅग एखाद्या खास मॅन्युफॅक्चर्ड प्रॉडक्टला किंवा कोणत्याही खास पिकाला किंवा नैसर्गिक उत्पादनाला दिला जातो. त्याची नोंद सरकार दरबारी घेतली जाते. मागील दोन ते तीन दिवसांपूर्वीच तांबुलाला जीआय टॅग मिळाला असून पुढील तीन ते चार महिन्यांत प्रमाणपत्र मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App