विशेष प्रतिनिधी
पुणे : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे चरित्र, त्यांनी देशासाठी केलेला त्याग समर्पण हे अनेक पुस्तकांच्या कलाकृतींच्या, व्याख्यानांच्या,नाटकांच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचत आहे. Swatantra Veer Vinayak Damodar Savarkar. New drama Triveni
मात्र सावरकरांच्या कुटुंबीयांचा त्याग समर्पण हेही तितकंच मोठं देश कार्य आहे. मात्र आजवर त्यांचे कुटुंबीय समाजापासून दूर होते, त्यांनी केलेला त्याग समोर पण ही लोकांना कळावं यासाठी महाराष्ट्र शासनाने एक मोठं पाऊल उचलला आहे.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कुटुंबीयांचा त्यांच्या देश कार्यात असणाऱ्या सहभाग सांगणारं” त्रिवेणी” या नाटयंप्रयोगाचा आयोजन खर्च आता महाराष्ट्र सरकार करणार असल्याचं शासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे. बाई,माई आणि ताई यां सावरकर घराण्यातील तीन रणनागिणीचीं कथा त्यांचा संघर्ष त्याग सांगणार हे नाटक आहे.
हाराष्ट्र सरकारच्या पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाने या नाटकासंबंधी जो निर्णय घेतलाय त्याचे सर्वत्र कौतुक होतं आहे.शासन या नाटकासाठी २ लाख २० हजार ५०० रुपयांचा खर्च करणार असल्याची माहिती पुढे आली आहे. गेल्या काही दिवसांपासून शासन या नाटकाबाबत मोठा निर्णय घेणार असल्याचे बोलले जात होते. अखेर त्यावर शासनाच्या वतीनं शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App