विशेष प्रतिनिधी
मुंबई : स्वारगेट बलात्कार प्रकरणातला आरोपी दत्तात्रय गाडे याचे राष्ट्रवादी कनेक्शन आढळले, पण त्याविषयी चकार शब्द न उच्चारता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या एका वक्तव्याला “स्कॅनर” लावला.Swargate rape accused Dattatreya Gade
दत्तात्रय गाडे शिरूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून वावरत होता सुरुवातीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार अशोक पवार यांच्या पोस्टरवर त्याचा फोटो झळकला होता. दत्तात्रय गाडेच्या व्हाट्सअप डीपीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माऊली कटके यांचा फोटो होता. दत्तात्रय हा अनेक ठिकाणी पोलीस असल्याचे सांगून तरुणांची ओळख वाढवत होता. त्याच्याविषयीच्या वेगवेगळ्या कहाण्या, माध्यमांमधून प्रसृत झाल्या.
स्वारगेट बलात्कार प्रकरणावर पत्रकारांना माहिती देताना राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी संबंधित तरुणीने आरडाओरडा करून कुणाचे लक्ष वेधून घेतले नाही म्हणून बलात्काराची घटना घडली. तिने आरडाओरडा केला असता तर ती घटना टळली असती, असे वक्तव्य केले. त्या वक्तव्यावरून योगेश कदम यांच्यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील योगेश कदम यांचे कान टोचले. कुठल्याही घटनेविषयी बोलताना मंत्र्याने संवेदनशील पणे बोलले पाहिजे. अनावश्यक वादग्रस्त विधाने करता कामा नयेत, असे फडणवीस आणि अजित पवार म्हणाले. पण दत्तात्रय गाडे याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कनेक्शन बद्दल जितेंद्र आव्हाड यांनी तोंड उचलले नाही किंवा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी देखील कुठले भाष्य केले नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App