विशेष प्रतिनिधी
मालेगाव : राज्यात यावर्षी अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आणि याचमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांची दिवाळी काळी झाली म्हणून मंत्र्यांची दिवाळी गोड होऊ देणार नाही असे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कृषिमंत्री दादा भुसे यांच्या घरासमोर आंदोलन केले.
Swabhimani Shetkari Sanghatana agitation in front of Agriculture Minister Dada Bhuse’s house
शेतकरी संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे यांच्या नेतृत्वाखाली भुसे यांच्या मालेगाव येथील निवासस्थानासमोर हे अांदाेलन करण्यात अाले. अांदाेलनादरम्यान कृषिमंत्री यांनी ‘स्टंटबाजी’ न करता चर्चा करून आपले प्रश्न मार्गी लावू असे हात जोडून विनंती केली. दरम्यान ‘स्टंटबाजी’ या शब्दावर आक्षेप घेत आंदोलकांनी यावेळी आणखीन जोरदार घोषणाबाजी केली.
कोरोना काळात मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचे उत्तम काम, वडिलांप्रमाणे भूमिका निभावली; पवारांकडून कौतूक; दादा भुसेंची माहिती
आंदोलनादरम्यान दोन तास कृषिमंत्री दादा भुसे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलक यांनी विविध प्रश्नांवर चर्चा केली. या चर्चेदरम्यान अांदाेलकांना समाधानकारक अशी उत्तरे मिळाल्यानंतरच त्यांनी हे आंदोलन मागे घेण्याची तयारी दर्शवली.
सरकारने पीक विम्याचे पैसे दिले नाहीत. दिवाळीपूर्वी अतिवृष्टीचे पैसे जमा होतील असे सांगितले होते. मात्र ते अद्यापही झाले नाहीत. त्यामुळे शेतकर्यांची दिवाळी काळी झाली. म्हणून आम्ही सुद्धा त्यांची दिवाळी गोड होऊ देणार नसल्याचे सांगत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कृषी मंत्री दादा भुसे यांच्या बंगल्यावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App