विशेष प्रतिनिधी
मुंबई : शरद पवारांचे निवृत्ती नाट्य घडल्यानंतर महाराष्ट्रात ज्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडत आहेत, त्यापैकी एक घडामोडी आज घडली आहे. ती दोन परस्पर विरोधी पक्षांमधल्या नेत्यांकडून घडली आहे. एकमेकांच्या ठाम विरोधात असूनही सुषमा अंधारे यांचे अश्रू आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य एकाच सूरात कसे काय उमटले आहेत??, हा सवाल यातून तयार झाला आहे. Sushma andhare and devendra Fadanavis signals same damage in NCP in future
पवारांसमोर सुषमा अंधारे रडल्या
सुषमा अंधारे यांनी आज साताऱ्यातल्या कार्यक्रमात शरद पवारांसमोरच डोळ्यातून पाणी काढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या आमदारांच्या विरोधात तक्रार केलीच, पण त्यापलीकडे त्यांची तक्रार थेट विरोधी पक्ष नेते अजित पवारांविषयी होती. माझ्या विरुद्ध शिंदे गटाचे आमदार, नेते अश्लाघ्य भाषेत बोलतात. पण विरोधी पक्षनेते असूनही ते समोर बसून ऐकून घेतात. ते प्रतिकारही करत नाहीत, असे सुषमा अंधारे यांनी अजितदादा आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत डोळ्यातून अश्रू काढत सांगितले. आपले दुःख सांगताना सुषमा अंधारे यांना आपले अश्रू आवरत नव्हते. त्यांची तक्रार जितकी शिंदे गटाच्या विरोधात होती, तितकीच ती अजितदादांच्या विरोधातही उमटली.
अजितदादांविरुद्ध तक्रार
एकीकडे सुषमा अंधारे थेट शरद पवारांकडे अजितदादांच्या विरोधात तक्रार केली, तर दुसरीकडे अमरावतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे एकच वक्तव्य केले, ज्यामुळे राष्ट्रवादीत फुटीच्या संशयाचे वादळ पुन्हा एकदा घोंगवायला लागले आहे.
फडणवीसांची राष्ट्रवादीत ठिणगी
शरद पवार राष्ट्रवादीची एकसंधता टिकवण्यासाठी कसरत करत आहेत. त्यांची कसरत पाहिली की त्यांनी इतर पक्षांविषयी बोलावे की नाही हे त्यांनी ठरवावे, असा टोला फडणवीस यांनी हाणून घेतला आहे.
वास्तविक सुषमा अंधारे यांचे अश्रू आणि फडणवीस यांचे वक्तव्य यांच्यात किमान 250 किलोमीटरचे अंतर होते. सुषमा अंधारे साताऱ्यात पवारांसमोर भाषण करत होत्या, तर फडणवीस यांचे वक्तव्य अमरावतीतून आले आहे. पण या दोन्ही नेत्यांचा राजकीय सूर मात्र अजितदादांच्या संदर्भातला आहे. सुषमा अंधारे यांची अजितदादांविरुद्ध तक्रार होती, तर देवेंद्र फडणवीस यांनी, पवारांनी निवृत्ती नाट्य घडविल्यानंतरही राष्ट्रवादीत सर्व काही अलबेला नाही असे सूचित करून राष्ट्रवादीत बंड कोण करू शकतो??, याच्या संशयाची ठिणगी टाकून दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App