विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत गडचिरोली येथे ₹6 कोटींचे बक्षीस असणाऱ्या वरिष्ठ माओवादी कमांडर मल्लोजुला वेणुगोपाल राव उर्फ सोनू भूपती यांचे इतर 60 माओवादी सदस्यांसह आत्मसमर्पण केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या सर्वांना संविधानाची प्रत देऊन महाराष्ट्राच्या आणि देशाच्या मुख्य राजकीय आणि सामाजिक प्रवाहात समाविष्ट करून घेतले. Devendra Fadnavis
यावेळी आमदार डॉ. मिलींद नरोटे, महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नक्षलवाद्यांचा मुख्य प्रवाहात समावेश झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आत्मसमर्पण केलेल्या 61 वरिष्ठ माओवादी सदस्यांवर एकूण ₹5,24,00,000 चे बक्षीस पोलिसांनी लावले होते. सोनू भूपती हा गेली 40 वर्षे माओवाद्यांमध्ये सामील होता. परंतु त्याने देशाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी आत्मसर्पणाची तयारी दाखविली. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने त्याला ती संधी उपलब्ध करून दिली. महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात माओवाद्यांनी आपल्या शस्त्रांसह आत्मसर्पण केले. या सर्वांचा देशाच्या मुख्य प्रवाहात लोकशाही मूल्यांवर विश्वास निर्माण व्हावा या हेतूने राज्य सरकारने त्यांना संविधानाची प्रत देऊन मुख्य प्रवाहात सामील करून घेतले.
त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी 14 फेब्रुवारी रोजी आज गडचिरोलीतच आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांना पुनर्वसनासाठी प्रातिनिधिक स्वरुपात मदत म्हणून धनादेशांचे वितरण केले.
– मंगलसिंह साहागू तुलावी – ₹2,50,000 – अनुसया बंडू उईके – ₹2,50,000
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App