प्रतिनिधी
बीड : Suresh Dhas बीडमधील शिरूर कासार येथे एका व्यक्तीला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सतीश भोसले याच्यावर अनेक गंभीर आरोप होत आहे. तेव्हापासून या सतीश भोसले उर्फ ‘खोक्या’ची चर्चा सुरू आहे. सतीश भोसले हा भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे खुद्द सुरेश धस यांनी हे मान्य केले होते. सतीश भोसलेचे सुरेश धसांसोबतचे फोटो, त्याच्या वाढदिवसाला दिलेल्या शुभेच्छा, तसेच तो दाखवत असलेले पैसे या सर्वांवर सुरेश धस यांनी ‘एका मराठी वृत्तवाहिनी’ने घेतलेल्या मुलाखतीत बोलताना खुलासा केला आहे.Suresh Dhas
सुरेश धस म्हणाले, हा जो महाशय आहे तो पारधी समाजाचा मुलगा आहे. त्याच्यावर दोन गुन्हे तर मीच दाखल करायला लावले आहेत. आता भोसले आडनाव म्हणून काल-परवा पासून फिरवले जातंय. काही जणांकडून असे सांगितले जातंय की, तो मराठा समाजाचा आहे. पण तो मराठा समाजाचा नाही. पारधी समाजाचा आहे. त्याची काय टोळी वगैरे नाही. तो मुकादमांना लेबर पुरवणाऱ्यांपैकी एक कार्यकर्ता आहे. त्याची जी चूक झाली असेल, त्या चुकांबाबत आम्ही त्याच्या कधी पाठीशी उभे राहत नाहीत, असे सुरेश धस म्हणाले.
सतीश भोसले माझा कारभार थोडी चालवतो?
फेसबुकवर कोण कुणाला बॉस करेल, कोण कुणाला त्याचे सरकार करेल, त्याचे आपण काय करु शकतो? बॉस म्हणून लिहिले, सरकार म्हणून लिहिले, असे अनेक लोकं लिहितात ना, तो काय माझा कारभार वगैरे थोडी चालवतो?, असा सवाल सुरेश धस यांनी केला. धनंजय मुंडे यांचा पूर्ण कारभार वाल्मीक कराड पाहायचा. तसाच सतीश भोसले हा माझ्याशी इतका संबंधित किंवा जवळचा नाही. तो भोसले मुकादमांना लेबल पुरवण्याची काम करतो. एवढी मला त्याची माहिती असल्याचे सुरेश धस म्हणाले.
तो काही दिवसा माझ्या विरोधातही गेला
माझ्याकडे आल्यानंतर कुणाला फोटोसाठी नाही म्हणता येत? फोटो काढायचा आहे तर काढा. तो मागे काही दिवस माझ्या विरोधातही गेला होता. तो पंकजा ताईंच्या गटात गेला होता. आमचा गट सोडून गेला खोक्या, असा खुलासा सुरेश धस यांनी केला.
‘खोक्या’ला दिलेल्या शुभेच्छांवर धस म्हणाले…
शुभेच्छा द्याव्याच लागतात ना? सर्व दुनियेला शुभेच्छा द्याव्या लागतात. आदल्या दिवशी मी विसरलो असेल, मग कुणीतरी सांगितले की, याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या राहिल्या आहेत. त्यामुळे बीलेटेड वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तुम्ही तुमचाही जन्म दिवस द्या. तुम्हालाही बीलेटेड का असेना, तुम्हालाही शुभेच्छा देऊन टाकेन, असाही खुलासा सुरेश धस यांनी केला.
…म्हणून सतीश भोसलेकडून पैसे उधळले गेले
मी त्याच्या कृत्यांवर पांघरुन घालणार नाही. पण अजूनही पारधी समाज, भील समाज, कोकणा समाज किंवा शेड्यूल ट्राईब यांच्या जीवनात अजूनही पहाट झालेली नाही. मग मुकादमीमध्ये त्याने जास्त पैसे कमावले. तो त्याचा प्रश्न आहे. त्याने दोन-तीन लाख जमा केले आणि नंतर बोर्डवर टाकताना मी खोक्या पाहिला आहे. त्याचा व्हिडीओ त्याने स्वत: बनवला आहे. तो दाखवतोय. मला असे वाटते की, त्याच्यामध्ये असलेले अज्ञान. या फोटो काढण्याचा काय परिणाम याची जाण नसल्यामुळे त्याच्याकडून पैसे उधळले गेले. त्याला असेच कुणीतरी खोक्या म्हटले असेल. हा एवढा मोठा खोक्या बिक्या नाही, असे सुरेश धस यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App