Suresh Dhas : सुरेश धस यांचा आरोप, धनंजय मुंडे कृषिमंत्री असताना 300 कोटींचा ‎घोटाळा, वाल्मीकनेच ठरवल्या निविदा!

Suresh Dhas

प्रतिनिधी

बीड : Suresh Dhas राज्याचे तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या‎‎कार्यकाळात कृषी खात्यात ३०० कोटी‎‎रुपयांचा घोटाळा झाला आहे.‎‎वाल्मीक कराडने निविदा ठरवल्या,‎‎महाराष्ट्रात एजंट नेमले, असा आरोप‎‎भाजप आमदार सुरेश धस यांनी‎‎केला. गुरुवारी आष्टीत त्यांनी‎पत्रपरिषद घेतली. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याचा‎अधिकार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आहे.‎सिंचन घोटाळ्याच्या आरोपानंतर अजित पवार यांनी‎स्वतः राजीनामा दिला होता. मग धनंजय मुंडे का देत‎नाहीत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.‎Suresh Dhas

आमदार धस म्हणाले, शेतकरी किंवा क्षेत्रीय‎अधिकाऱ्यांची मागणी नसताना धनंजय मुंडे यांनी‎खरेदीचा निर्णय घेतला. एकाच दिवशी प्रस्ताव पाठवला‎आणि त्याच दिवशी शासन निर्णय (जीआर) निघाला.‎कृषिमंत्री असताना धनंजय मुंडे निविष्ठा खरेदीत बदल‎केला. नॅनो युरिया खरेदीत २१ कोटी २६ लाखांचा घोटाळा‎करण्यात आलेला आहे, असे धस यांनी सांगितले.‎



भारतीय किसान संघाने मुख्यमंत्री‎देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून या‎घोटाळ्याची चौकशी करण्याची‎मागणी केली होती. मात्र, वाल्मीक‎कराड यांनी हे पत्र फाडून टाकल्याचा‎आरोप आमदार धस यांनी केला.‎कृषी विभागाला आव्हान देतो, हे पत्र‎तुमच्याकडे आहे का, असा सवाल‎धस यांनी केला. मुख्यमंत्री‎फडणवीस यांनी याचे उत्तर द्यावे,‎अशी मागणी केली. धनंजय मुंडे‎यांनी केलेल्या बदल्यांमध्ये १००‎कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर‎आरोप त्यांनी केला. बदल्यांसाठीचे‎रेट कार्ड त्यांच्या सहकाऱ्यांकडे‎सापडले. या बदल्यांमधून मिळणारा‎पैसा थेट धनंजय मुंडे यांच्याकडे‎जात होता, असा दावा त्यांनी केला.‎

खटला दाखल करा, धस यांचे मुंडे यांना आव्हान‎

राज्यात ठराविक एजंटांची नेमणूक‎करण्यात आली होती. या सर्वांचे‎कॉल डिटेल्स तपासा. १०० कोटींपेक्षा‎अधिकचा भ्रष्टाचार यात आहे.‎वाल्मीक कराड याने निविदा‎ठरवल्या. गैरव्यवहार केवळ‎बीडपुरता नव्हता, तर संपूर्ण‎महाराष्ट्रभर पसरलेला होता. आता‎कागदाचा लढा सुरू झाला आहे,‎खटला दाखल झाला तरी मी माघार‎घेणार नाही, असे धस म्हणाले.‎धनंजय मुंडे यांनी अंजली‎दमानियांऐवजी माझ्यावर खटला‎दाखल करावा, असे आव्हान दिले.‎

मंत्री मुंडे राजीनामा का देत नाहीत, आ. धसांचा सवाल ‎

धनंजय मुंडे यांनी आता अर्ज आणि‎लगेच कर्ज या पद्धतीने सर्व प्रक्रिया‎केली. टेंडर अतिशय नियोजनबद्ध‎पद्धतीने काढले. कुणालाही संशय‎येऊ नये याची काळजी घेतली. नॅनो‎युरियामध्ये २१ कोटी २६ लाख,‎डीएपीमध्ये ५६ कोटी ७६ लाख,‎बॅटरी खरेदीत ४५ कोटी ५३ लाख‎आणि कापूस साठवणुकीची ५७७‎रुपयांची बॅग १,२५० रुपयांना खरेदी‎करण्यात आली. एकूण १८० कोटी ८३‎लाख रुपये धनंजय मुंडे आणि‎त्यांच्या टीमने बाहेर काढल्याचा‎आरोप आमदार धस यांनी केला.‎रफिक नाईकवाडे हे या‎घोटाळ्यातील सूत्रधार असून, भामरे‎हे आजही त्यांच्यासोबत आहेत,‎असा दावा धस यांनी केला.‎

Suresh Dhas alleges that there was a scam of Rs 300 crore when Dhananjay Munde was the Agriculture Minister, Valmik himself decided the tenders!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात