विशेष प्रतिनिधी
मुंबई : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी छावा संघटनेचे कार्यकर्ते विजय घाडगे पाटील यांना मारहाण केली. तो मुद्दा राज्यभर पेटल्यानंतर सुरज चव्हाण यांना माफी मागायची उपरती झाली. पण या सगळ्या प्रकारात अजित पवारांच्या राष्ट्रवादीबरोबरच फडणवीस सरकारची बदनामी झाली. त्यामुळे अजित पवार आता सुरज चव्हाण यांच्यावर कुठली कठोर कारवाई करणार का??, असा सवाल तयार झाला.
याच दरम्यान सुरज चव्हाण यांच्या विरोधात लातूरच्या विवेकानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांची दोन विशेष पथके चव्हाण यांच्या शोधासाठी रवाना झाल्याची बातमी मराठी माध्यमांनी दिली.
विधिमंडळात मोबाईलवर रम्मी खेळण्यात मग्न झालेल्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मागण्यासाठी आंदोलन केलेल्या विजय घाडगे पाटलांना सुरज चव्हाण यांनी मारहाण केली. या मारहाणीचे नंतर त्यांनी समर्थन केले. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या सगळ्या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर सुरज चव्हाण यांना माफी मागायची उपरती झाली. त्यांनी आपल्या सोशल मीडियावर माफी मागणारा व्हिडिओ शेअर केला. यात त्यांनी छावा संघटना आपली बंधू असल्याचे सांगून संबंधित वादाला घरगुती वळण द्यायचा प्रयत्न केला.
पण सुरज चव्हाण यांच्या कृत्याचे महाराष्ट्रभर पडसाद उमटले. त्यामुळे सुनील तटकरे यांनी आपल्या मराठवाडा दौऱ्यातून सुरज चव्हाण यांना वगळून टाकले. त्या पाठोपाठ अजित पवारांनी सुरज चव्हाण यांना ताबडतोब मुंबईला बोलवून घेतल्याची देखील बातमी आली. या पार्श्वभूमीवर अजित पवार आपल्याच पक्षातून होणारी दादागिरी कशी रोखणार??, सुरज चव्हाण यांच्यावर कठोर कारवाई काय करणार??, असा सवाल तयार झाला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App