सुप्रिया सुळेंकडून पुन्हा एकदा फडणवीस लक्ष्य; आता ‘या’ कारणावरून मागितला राजीनामा!

जाणून घ्या, सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या आहेत?

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे सातत्याने उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्य्यावरून आतापर्यंत लक्ष्य केल्यानंतर, आता सुळेंनी प्रकाश सोळुंके यांच्या विधानाचा मुद्दा हाती घेत मुख्यमंत्र्यांकडे फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. Supriya Sules demand for Devendra Fadnavis resignation on Prakash Solunken’s legislation

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेले उपोषण काल थांबवले. सरकारकडून मंत्र्यांचे शिष्टमंडळ चर्चेसाठी पाठवण्यात आल्यानंतर, काही अटींसह मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित केले. तत्त्पूर्वी जरांगेंचे उपोषण सुरू असताना बीडमध्ये हिंसाचार उफाळला होता. आंदोलक आक्रमक झाले होते. यातूनच त्यांनी जाळपोळ, दगडफेक आदी घटना घडल्या होत्या.

या दरम्यान अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळुंके, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घराला आग लावली, वाहनांचे नुकसान केल्याने मोठी खळबळ उडाली होती. या मुद्य्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीसांवर पुन्हा एकदा निशाणा साधत, मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.


संसद रत्नांनी आम्हाला सल्ला देऊ नये, सुनील तटकरेंचा हा टोला झोंबताच सुप्रिया सुळेंनी परजले निलंबनाचे हत्यार!!


सुप्रिया सुळे म्हणाल्या, ”राज्य सरकारला पाठिंबा देणारे आमदार स्वतः सांगत आहेत त्यांच्या घरावर झालेला हल्ला पुर्वनियोजित होता.हल्लेखोरांकडे हत्यारे, पेट्रोलबॉम्ब, दगड आदी होते. या संपूर्ण घटनाक्रमात पोलीसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली असेही त्यांचे म्हणणे आहे. ते गृहखाते आणि गृहमंत्री महोदयांचे अपयश अधोरेखित करीत आहेत.”

याचबरोबर ”जर या राज्यात सत्ताधारी आमदारांचीही घरे सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य जनतेचे काय हा प्रश्न आहे. राज्याचे गृहमंत्री सपशेल अपयशी ठरलेत आणि त्यांना गृहखाते झेपत नाही याचा हा आणखी मोठा पुरावा आहे. मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने गृहमंत्र्यांचा राजीनामा घेऊन त्यांना छत्तीसगडमध्ये प्रचारासाठी मोकळे करावे.” असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

प्रकाश सोळुंके नेमकं काय म्हणाले –

हल्ल्याच्या घटनेबाबत प्रकाश सोळुंके म्हणाले होते की, ”मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मी आणि माझे कुटुंबीय त्यांच्या आंदोलनात सहभागी आहोत, पण 30 ऑक्टोबरला माझ्या घरावर हल्ला करण्यात आला. 200 ते 300 जण तयारीनेच आले होते. त्या समाजकंटकांनी दगडफेक करत माझे घर जाळले. या समाजकंटकांकडे पेट्रोल बॉम्ब आणि मोठे दगड होते. हे सर्वजण प्लॅनिंग करून आले होते. हा एक पूर्वनियोजित कट होता”
याशिवाय “जाळपोळीची घटना घडली, हे गृहविभागाचे अपयश आहे. जेव्हा घटना घडली, तेव्हा पोलिसांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. माझ्या समोर एक जण घरावर दगड फेकत होता. मात्र, पोलीस फक्त उभे होते, त्यांनी काही केले नाही. याबाबत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याबरोबर माझे बोलणे झाले असून, पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली हे मी त्यांना सांगितले आहे”, असंही प्रकाश सोळंके म्हणाले आहेत.

Supriya Sules demand for Devendra Fadnavis resignation on Prakash Solunken’s legislation

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात