जादा निधी खेचण्यावरून सुप्रिया सुळे – सुनील शेळके भिडले; मुख्यमंत्र्यांना विचारून निधी देऊ, शरद पवारांसमोर अजितदादांनी ठणकावले!!

विशेष प्रतिनिधी

पुणे : जिल्हा नियोजन समितीला जादा निधी खेचण्यावरून खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार सुनील शेळके एकमेकांना भिडले. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दोन्ही नेत्यांचा वाद झाला. मात्र, त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारूनच निधी देऊ, असे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष अजित पवारांनी शरद पवारांसमोर दोन्ही नेत्यांना ठणकावून सांगितले. Supriya Sule – Sunil Shelke clashed over withdrawal of excess funds

पुणे जिल्हा नियोजन समितीची उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीला झाली. या बैठकीला खासदार शरद पवार आवर्जून हजर होते, त्याचबरोबर खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार चेतन तुपे, सुनील शेळके, सुनील कांबळे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. ही बैठक वादळी ठरली आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्यासमोरच अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके, खासदार सुप्रिया सुळे यांच्यात वाद झाला.

बारामती आणि शिरुर लोकसभा क्षेत्रात विकास काम करण्यासाठी निधी दिला जात नाही, मात्र दुसर्‍या बाजूला मावळसाठी मोठ्या प्रमाणावर निधी देण्यात आला, अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी बैठकीमध्ये मांडली. कदाचित मी आणि अमोल कोल्हे आमच्या मतदार संघासाठी कमी पडत असू आम्ही निधी जास्त मिळण्यासाठी श्रीरंग बारणे यांचे मार्गदर्शन घेऊन असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला पण त्यावर ताई तुम्ही आमच्या मावळ मतदारसंघाचा उल्लेख सारखा का करता??,

ज्यावेळी बारामती करीता मोठ्या प्रमाणावर निधी मिळत होता, त्यावेळी आम्ही कधी बारामती – बारामती म्हटले का ?? असा सवाल करून शेळके यांनी सुप्रिया सुळे यांना टोकले. सुप्रिया सुळे आणि सुनील शेळके यांच्यातील वाद लक्षात घेत निधी देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करून निधी देऊ, असे अजित पवार यांनी शरद पवारांसमोर सुप्रिया सुळे आणि सुनील शेळके या नेत्यांना ठणकावून दोघांचा वाद थांबविला. त्यानंतर इतर प्रश्नांवर चर्चा सुरू झाली.

Supriya Sule – Sunil Shelke clashed over withdrawal of excess funds

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात