सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या प्रभारी झाल्याबरोबर राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष पदाची स्पर्धा; पण सुप्रिया सुळेंना फडणवीसांच्या विरोधातील कथित षडयंत्राची “काळजी”!!

प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात एकीकडे खासदार सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभारी झाल्यानंतर विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी पक्ष संघटनेत मोठे पद मागितले. त्याबरोबर पक्षात प्रदेशाध्यक्षपदासाठी मोठे घमासान सुरू झाले आहे. जयंत पाटील यांच्यापासून ते छगन भुजबळापर्यंत अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पण राष्ट्रवादीतल्या घमासांनां ऐवजी सुप्रिया सुळे यांना देवेंद्र फडणवीसांविरुद्ध भाजपमध्ये सुरू असलेल्या कथित षडयंत्राची “काळजी” लागली आहे!Supriya Sule in charge of Maharashtra, the competition for the post of state president in the NCP; But Supriya Sule is “concerned” about the alleged conspiracy against Fadnavis!!

देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध त्यांच्याच पक्षातले काही नेते षडयंत्र रचत आहेत. सरकारने दिलेल्या जाहिरातीत फडणवीस यांचे नावही नव्हते. त्यांचा सरकारमधल्या काही नेत्यांनी फडणवीसांचा अपमान करणे सुरू केले आहे, असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी पुण्यात केले.



अर्थात भाजपमध्ये फडणवीस यांच्याविरुद्ध षडयंत्र सुरू आहे की नाही, हा भाग अलहिदा. पण सुप्रिया सुळे मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष पदाबरोबरच महाराष्ट्राच्या प्रभारी झाल्याबरोबर राष्ट्रवादीतच पक्ष संघटनेत काम करण्यासाठी, त्यातही प्रदेशाध्यक्ष पदावर काम करण्यासाठी मोठे घमासान सुरू झाले आहे. अजित पवारांनी विरोधी पक्ष नेते पद सोडून शरद पवारांकडे पक्ष संघटनेत मोठे पद मागितले. त्याच कार्यक्रमात जयंत पाटलांनी अजितदादा माझे पक्ष प्रदेशाध्यक्ष पदाची वर्षे आणि महिने मोजतात, असा टोला हाणला आणि अजितदादांनी पक्ष संघटनेच्या मोठ्या पदाची मागणी करतात छगन भुजबळ यांनी नाशिक मधून ओबीसी कार्ड पुढे केले.

विरोधी पक्षनेतेपदी मराठा समाजाचा नेता असेल तर प्रदेशाध्यक्षपदी ओबीसी समाजाचा किंवा लहान समाजाचा नेता बसवला पाहिजे, अशी मागणी भुजबळ यांनी केली. याचा अर्थच राष्ट्रवादीतच संघटनात्मक पातळीवर अस्वस्थता निर्माण झाली आहे, ती देखील सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या प्रभारी झाल्यावर!!

या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीतल्या अंतर्गत घामासावर प्रतिक्रिया व्यक्त न करता देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध भाजपचेच नेते षडयंत्र रचत असल्याचे वक्तव्य केले. यातून त्यांना स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधील अस्वस्थतेऐवजी भाजपमधील घडामोडींची जास्त “काळजी” लागून राहिल्याचे दिसून आले.

Supriya Sule in charge of Maharashtra, the competition for the post of state president in the NCP; But Supriya Sule is “concerned” about the alleged conspiracy against Fadnavis!!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात